असोदा येथील सार्वजनिक विद्यालयात वृक्ष दिंडी व झाडांच्या रोपांचे वाटप
![]()


असोदा येथील सार्वजनिक विद्यालयात वृक्ष दिंडी व झाडांच्या रोपांचे वाटप
असोदा येथील सार्वजनिक विद्यालयातून राष्ट्रीय हरित सेने तर्फे टाळ मृदुंगांच्या गजरात वृक्षदिंडी काढण्यात आली. पर्यावरण विषयक घोषणा देऊन मुला-मुलींनी पर्यावरणाचे महत्त्व पटवून जागृती केली. वृक्ष लागवड,प्लास्टिक मुक्ती याविषयी विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा केलेली होती.
वृक्षदिंडीचा कार्यक्रम पार पाडण्यासाठी श्रीराम मंदिर संस्थेच्या भजनी मंडळातील ह. भ. प. डालेंद्र महाराज, धीरज महाराज, दिलीप महाराज,गोपाळ भोळे, गलू चौधरी, वासू चौधरी, गोविंदा सावदेकर व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
वृक्षदिंडीत संस्थेचे अध्यक्ष श्री विलास चौधरी,मुख्याध्यापक श्रीमती विद्या खाचणे, पर्यवेक्षक डॉ. मिलिंद बागुल, संचालक सुनील चौधरी,गोपाळ भोळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
वृक्षदिंडीचे नियोजन हरीत सेनाप्रमुख गोपाळ महाजन यांनी केले.
वृक्षदिंडीनंतर परिसरातील नागरिक व विद्यार्थ्यांना संस्थेचे संचालक श्री सुनील चौधरी यांच्या हस्ते झाडांच्या रोपांचे वाटप करण्यात आले.
सुनील चौधरी यांनी झाड पर्यावरण संतुलनसाठी कशा प्रकारे मदत करते या विषयी माहिती दिली. आपल्या वाढदिवसाच्या दिवशी प्रत्येक विद्यार्थ्यांनी एक झाड लावावे असे आवाहन मुख्याध्यापिका श्रीमती विद्या खाचणे यांनी केले.
वृक्ष लागवडीचा व सहा महिन्यानंतर वृक्ष जगल्याचा फोटो माझ्या मोबाईलवर पाठवावा असे आवाहन हरित सेनेचे गोपाळ महाजन यांनी केले. याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे संचालक श्री सुनील चौधरी मुख्याध्यापिका श्रीमती विद्या खाचणे पर्यवेक्षक डॉ. मिलिंद बागुल, एल.जे.पाटील, नरेंद्र भंगाळे, प्रेमराज बऱ्हाटे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाळ महाजन यांनी तर आभार सचिन जगले यांनी मानले.
कोट-👆वृक्षदिंडीत श्रीराम मंदिर संस्थेचे भजनी मंडळ, संस्थेचे अध्यक्ष विलास चौधरी, मुख्याध्यापिका श्रीमती विद्या खाचणे, पर्यवेक्षक डॉ.मिलिंद बागुल,प्रशांत कोल्हे,हरित सेना प्रमुख गोपाळ महाजन व इतर

