कल्याण येथील रिक्षा चालकाची मुलगी प्राची सौंदाणेची चार्टर्ड अकाऊंटंट परिक्षेत उंच भरारी.
![]()

कल्याण येथील रिक्षा चालकाची मुलगी प्राची सौंदाणेची चार्टर्ड अकाऊंटंट परिक्षेत उंच भरारी.
मुंबई,ठाणे ( मनिलाल शिंपी ):कल्याण येथील रिक्षा चालक प्रकाश मगन सैंदाणे उंदीर खेडेकर हल्ली मुक्काम कल्याण यांची कन्या कुमारी प्राची प्रकाश सैंदाणे हिने चार्टर्ड अकाउंटंट परीक्षा उत्तीर्ण होऊन ती सीए डिग्री प्राप्त केली. वडील श्री प्रकाश सैंदाणे कल्याण मध्ये रिक्षा चालवून व आई वंदना सैंदाणे यांनी देखी शिवणकाम करून मुलींना उच्चशिक्षित करून मोठी मुलगी अमेरिकेला आहे व धाकटी मुलगी सीए झाली.कल्याण येथील प्रकाश सौंदाने रिक्षा चालक यांची द्वितीय कन्या कुमारी प्राची प्रकाश सौंदाने हिने नुकत्याच झालेल्या चार्टर्ड अकाउंटंट च्या अंतिम परीक्षेत उत्तीर्ण होऊन सी.ए. ही पदवी मिळवली आहे. कु. प्राची हिच्या घवघवीत यशामध्ये तिचे आईवडील, मामा रविन्द्र नेरपगार यांचे अपार कष्ट आहेत. . कुमारी प्राची हिने अतिशय गरीब परिस्थितीतून वडील रिक्षा चालक असूनही आपल्या मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रेरणा दिली.मोठी मुलगी अमेरिकेत आहे. लहानपणापासून खूप चिकाटीने व अभ्यासाने व जिद्दीने हे यश मिळविले आहे कुमारी हिला पुढील आयुष्यासाठी व वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा व शैक्षणिक यशासाठी श्री. क्षत्रिय अहिर शिंपी समाज कल्याण तर्फे खूप खूप हार्दिक अभिनंदन उपाध्यक्ष सचिव व समस्त समाज बांधव कल्याण , अंबिवली, शहाड,डोंबिवली श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज यांच्याकडून अभिनंदन आणि कौतुक करण्यात येत आहे. समाजातील सर्व मुला मुलींनी कुमारी प्राची सौंदाणे हिच्या कर्तुत्वाच्या आणि जिद्दीच्या आदर्श घेऊन भावी आयुष्यात वाटचाल करावी. तसेच एका रिक्षा चालकाची जिद्द आणि शिक्षणाबद्दल आदर याबाबतही समाजाने प्रकाश सौंदाणे यांच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या मुला-मुलींना आदर्श नागरिक घडविण्यासाठी प्रेरणा घ्यावी.

