दगडी दरवाजा येथे धरण जन आंदोलन समितीच्या वतीने ना.अनिल पाटील यांचा जोरदार स्वागत सत्कार
![]()


दगडी दरवाजा येथे धरण जन आंदोलन समितीच्या वतीने जोरदार स्वागत सत्कार
नामदार अनिलदादा पाटील यांचे झाले भव्य दिव्य स्वागत…
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
पाडळसरे धरण जन आंदोलन समितीच्या वतीने अनिल दादा पाटील यांचं भव्य स्वागत अमळनेरच्या दगडी दरवाजा येथे समितीचे हेमंत भांडारकर देविदास देसले,अर्बन बँक संचालक रणजित शिंदे, महेश पाटील, रामराव पवार, सुनील पाटील, दिलीप पाटील,प्रविण संदानशिव,राजेंद्र देसले, नारायन बडगुजर यांचेसह मोठ्यासंख्येने पाडळसरे धरणाच्या मागणीच्या टोप्या घातलेल्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आतिषबाजीत मोठ्या जल्लोषात स्वागत व सत्कार केला. नामदार पाटील अमळनेरला आल्यानंतर त्यांनी अमळनेर भूमीचा नमस्कार केला..
अमळनेरला अनिलदादा यांचा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाडू तुला करण्यात आला . कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील व सर्व संचालक मंडळ यांनी जंगी सत्कार केला.
मंगळ ग्रह येथे भेट घेऊन मंगळ ग्रह संस्थांनच्या वतीने संस्थांचे अध्यक्ष डिगंबर महाले व सर्व विश्वस्त यांनी त्यांचा जंगी सत्कार करण्यात आला. मंगळ ग्रह मंदीरात ना. पाटील यांनी दर्शन घेतले..
त्यानंतर अमळनेरला वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून व पक्षांच्या माध्यमातून व कार्यकर्ते ,विविध संस्थांचे पदाधिकारी,पत्रकार, हिंदी अध्यापक मंडळ,रिक्षा युनियन, ट्रँक्सी युनियन,धनगर समाज, मराठा समाज अमळनेर, चेअरमन विकास सोसायटी,यांनी ना. अनिलदादा पाटील व यांचा सहपत्नीक सत्कार केला…







