1 min read

राष्ट्रीय फेडरेशन कप डॉजबॉल स्पर्धेसाठी राज्याचे संघाचे सराव शिबिरास अमरावती येथे उत्साहात सुरवात :

Loading

राष्ट्रीय फेडरेशन कप डॉजबॉल स्पर्धेसाठी राज्याचे संघाचे सराव शिबिरास अमरावती येथे उत्साहात सुरवात :


७ ते १० जुलै दरम्यान सुरत गुजरात येथे होणाऱ्या राष्ट्रीय फेडरेशन कप डॉजबॉल स्पर्धेसाठी सहभागी होणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या मुले मुली संघाचे सराव शिबीर अमरावती येथे सुरू आहे या शिबिराचे उदघाटन अमरावती येथील डॉ पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या वर्षा देशमुख यांचे हस्ते करण्यात आले याप्रसंगी महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशनचे सचिव शिवछत्रपती पुरस्कार्थी प्राचार्य डॉ हनुमंत लुंगे, प्रा डॉ उदय ठाकरे यांची उपस्थिती होती सराव शिबिरास अमरावती विभागाचे क्रीडा उपसंचालक विजय संतान यांनी भेट देऊन खेळाडूंशी संवाद साधला राज्य मुली संघाचे प्रशिक्षक म्हणून प्रा निलेश मुरकुटे (बीड) मुले संघाचे प्रशिक्षक म्हणून पवन धनकर (पुणे) तर मुली संघव्यवस्थापक म्हणून सुमित्रा खुणे (सोलापूर) व मुले संघव्यवस्थापक म्हणून प्रा विश्वास जाधव (अमरावती) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राजेश जाधव : उपाध्यक्ष : महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *