अमळनेरला क्षत्रिय फुलमाळी समाज संस्था यांच्या वतीने संत सावता महाराज पुण्यतिथी निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन…
![]()

अमळनेरला क्षत्रिय फुलमाळी समाज संस्था यांच्या वतीने संत सावता महाराज पुण्यतिथी निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन…
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
अमळनेरला संत सावता महाराज पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्याचे क्षेत्रीय फुल माळी समाज संस्थेचे अध्यक्ष व सर्व विश्वस्त मंडळ यांनी ठरवले सहविचार सभेत व समाजबांधव यांच्या विचारविनिमयाने ठरविले आहे.
संत सावता महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन 16 जुलै 2023 वार रविवार सायंकाळी ६ वाजता व महाप्रसादाचा कार्यक्रम क्षेत्रीय फुल माळी समाज संस्था मंगल कार्यालय अमळनेर येथे भोजणाची वेळ सायंकाळी साडेसात ते रात्री दहा वाजेपर्यंत आहे. तरी समाज बांधवांना विनंती की वरील कार्यक्रमासाठी आपणास शक्य असल्यास जास्तीत जास्त आर्थिक सहकार्य करावे. यासाठी महाप्रसाद सौजन्य चंद्रकांत उत्तम महाजन (वाघ) संचालक यु.के ज्वेलर्स अमळनेर, वरील कार्यक्रमास सर्व समाज बांधवांनी व महिला भगिनीनीं सक्रिय सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन क्षेत्रीय फुलमाळी समाज संस्थेचे अध्यक्ष दिलीप आत्माराम पाटील, उपाध्यक्ष दिनेश भाऊराव माळी, सचिव उदयकुमार ओंकार खैरनार, सहसचिव गोकुळ गोविंदा बागुल, खजिनदार महेश पांडुरंग माळी, विश्वस्त एडवोकेट सुरेश संतोष सोनवणे, रामचंद्र शंकर माळी, खेमराज रतन बोरसे, एडवोकेट नगराज शेणपुडू माळी विजय ईच्छाराम पाटील ,प्रवीण भिला महाजन यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे…

