सि.ए. परीक्षेत मयूर सपकाळे चे यश…
![]()

सि.ए. परीक्षेत मयूर सपकाळे उत्तीर्ण
अमळनेर प्रतिनिधी
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट ऑफ इंडीया मार्फन मे 2023 मध्ये घेण्यात आलेल्या सी. ए. च्या अंतिम परीक्षेत
मयूर अनिल सपकाळे याने प्रथम श्रेणीत यश प्राप्त केले आहे. सर्व सामान्य कुटुंबातून व एकत्रित परिवारात
राहुन अभ्यासाची जिद्द व चिकटीमुळे त्याने हे यश संपादन केले. मथुर सपकाळे याचे वडील अनिल सपकाळे
जैन इरिकेशन येथे सुपर वायझर या पदावर कार्यरत आहेत तर काका अरुण सपकाळे सर हे आर.आर विद्यालयात
कलाशिक्षक पदावर कार्यरत आहे. मयुरने आपल्या यशाच श्रेय आपल्या आई वडील व परिवाराला दिले आहे. त्याच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

