अमळगांव विदयालयाचे डी. जी. पवार यांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार….
![]()

अमळगांव विदयालयाचे डी. जी. पवार यांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार….
अमळनेर प्रतिनिधी
1 जुलै 2023 रोजी जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित , आदर्श माध्यमिक, उच्च माध्यमिक व व्यवसाय अभ्यासक्रम विभाग अमळगाव, शा. र. देशपांडे भाग शाळा जळोद ता अमळनेर यांच्या वतीने जेष्ठ शिक्षक डी. जी. पवार यांना त्यांच्या सेवानिवृत्तीबद्दल निरोप देण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस. एच. देशमुख होते.
या कार्यक्रमात विद्यालयाच्यावतीने सेवापुर्तीबद्दल डी. जी. पवार यांना सहपत्नीक स्मृतीचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ व कपडे देवून अत्यंत भावपूर्ण वातावरणात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी विचार मंचावर आदर्श विद्यालय अमळगावचे स्कूल कमिटी चेअरमन दीपकजी भोसले व उच्च माध्यमिक विभागाचे स्कूल कमेटी चेअरमन गिरीश सोनजी पाटील, वाय. के. पाटील, सी.जी.पाटील, ए. डी. साळुंखे , डी.बी.साळुंखे, रावसाहेब गुलाबराव पाटील, मुख्याध्यापक आर. यु. पाटील यांच्यासह बाळासाहेब डी. जी. पवार व सौ. मनिषा पवार उपस्थित होते. मुख्य सत्कारानंतर नातेवाईक, मित्रपरिवार व परिसरातील उपस्थित पदाधिकारी, मान्यवर यांनी देखील पवार यथोचित गौरव केला.
या कार्यक्रम प्रसंगी आर. एच.पाटील , गिरीश पाटील, चिरंजीव साहिल पवार व कन्या कु. सायली पवार, सेवानिवृत्त शिक्षक श्री एस. के. पाटील, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. आर.यु.पाटील, श्रीमती मनीषा सूर्यवंशी यांनी मनोगते व्यक्त केली. सत्काराला उत्तर देताना डी. जी.पवार यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या. सरते शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष एस. एच. देशमुख यांनी अध्यक्षीय भाषण केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रास्ताविक व आभार प्रदर्शन प्रा. संजीव पाटील यांनी केले.
या कार्यक्रमासाठी अमळगाव,निंभोरा, जळोद, मेहेरगाव,खेडी, खवशी, पिंपळी, पातोंडा येथील सर्व मान्यवर पदाधिकारी यांच्यासह प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक, मित्रपरिवार, नातेवाईक, आदर्श विद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

