1 min read

” शिक्षकांना बीएलओ ची सक्ती केली जाणार नाही”,अनिल बोरनारे यांची उपजिल्हाधिकाऱ्यांसमवेत चर्चा

Loading

” शिक्षकांना बीएलओ ची सक्ती केली जाणार नाही”

अनिल बोरनारे यांची उपजिल्हाधिकाऱ्यांसमवेत चर्चा

सरसकट सर्वांना बीएलओ चा निर्णय मागे


  • मुंबई (मनिलाल शिंपी) शाळांमधील सरसकट सर्वच शिक्षकांना बीएलओ च्या कामासाठी घेण्याचा निर्णय मागे घेतला असून कुणावरही सक्ती केली जाणार नसल्याचा निर्णय आज भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल बोरनारे व उपजिल्हाधिकारी यांच्या बैठकीत झाला.

मुंबईतील शिक्षकांना बीएलओ ड्युटीची सक्ती केली जाणार नाही, ऑर्डर न स्वीकारलेल्या शिक्षकांवर कोणतीही कारवाई होणार नाही तसेच बीएलओ कामासाठी अन्य प्रारूप ठरविले जाईल. या चर्चेला भाजपा शिक्षक आघाडीचे दशरथ काशीद, विजय धनावडे, विवेक विद्यालयाचे मुख्याध्यापक विवेक थोरात सर, संजय परदेशी सर, महाले सर, खरे सर विनोद पाटील सर यांच्यासह अन्य शिक्षक उपस्थित होते. मुंबईतील अनेक शाळांमध्ये मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक व शिक्षक सर्वांनाच बीएलओ च्या नियुक्त्या दिल्याने विद्यार्थ्यांना शिकवायचं कुणी असा प्रश्न शाळाचालकांना पडला होता याबाबत नियुक्त्या रद्द न झाल्यास विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी व शिक्षण निरीक्षक कार्यालयात शिकविण्यासाठी पाठविले जाईल असा इशारा भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल बोरनारे यांनी संबंधित विभागाला दिला होता तसेच भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल बोरनारे व शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी राज्याचे मंत्री रविंद्र चव्हाण यांची भेट घेऊन त्यांना वस्तुस्थिती सांगितली. मंत्रीमहोदयांनी लागलीच मुंबई उपनागरचे जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत लवकरच तोडगा काढू असे आश्वासन दिले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *