1 min read

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद कोकण विभाग अध्यक्ष पदी गुलाबराव पाटील यांची स्तुत्य निवड
शिक्षण क्षेत्रामध्ये सामाजिक दृष्टिकोन ठेवून आपुलकीची भावना निर्माण करणारे खरे शिक्षकसेवक आहेत.: वेणूनाथ कडू

Loading

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद कोकण विभाग अध्यक्ष पदी गुलाबराव पाटील यांची स्तुत्य निवड
शिक्षण क्षेत्रामध्ये सामाजिक दृष्टिकोन ठेवून आपुलकीची भावना निर्माण करणारे खरे शिक्षकसेवक आहेत.: वेणूनाथ कडू

ठाणे,कल्याण ( मनिलाल शिंपी) – महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ यांच्याशी सलग असून महाराष्ट्रात शिक्षण समस्या व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढत असते. नुकतेच राज्याचे कार्याध्यक्ष वेनुनाथ कडू यांच्या अध्यक्षतेखाली व माजी शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे राज्य कार्याध्यक्ष शिवाजी सागडे राज्य कार्यकारणी सदस्य श्याम पाटील व राज्याचे कोषाध्यक्ष निरीक्षक राजेंद्र सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत मानगाव येथे सभा संपन्न झाली .कल्याण येथील सम्राट अशोक विद्यालयाचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील सर यांची कोकण विभाग अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली .तसेच एकनाथ दळवी कार्याध्यक्ष ,लक्ष्मण वालगुडे कार्यवाह ,पी एन पाटील कोषाध्यक्ष ,सुविधा तावडे उपाध्यक्ष यांची कोकण विभागीय स्तरावर सर्वानुमते निवड केली .कोकण विभागातील विविध जिल्ह्यातील पदाधिकारी अनिल पाटील, दिलीप उभारे, विजय भामरे देवराज राऊत ,राजेंद्र दळे आप्पाराव कदम व रवींद्र जाधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *