1 min read

सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल
सचिन खंडारे यांना डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम पुरस्काराने सन्मानित..

Loading

सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल
सचिन खंडारे यांना डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम पुरस्काराने सन्मानित..

अमळनेर प्रतिनिधी- अमळनेर येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन भाऊ खंडारे यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल नुकतच धुळे येथे डॉ ए.पी.जे अब्दुल कलाम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सविस्तर माहिती अशी की नैसर्गिक मानव अधिकार सुरक्षा परिषद फोरम क्रांतीज्योती प्रतिष्ठान नंदुरबार व रायबा बहुउद्देशीय संस्था धुळे
लोकराजा राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीच्या औचित्य साधत सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय, कृषी कला, क्रीडा इत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नागरिकांचा नुकताच पुरस्काराने सन्मानित करण्यात आला. त्यात अमळनेर येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन भाऊ खंडारे यांनी आज तागायत उत्कृष्ट काम करीत विविध उपक्रम राबवले आहेत याची दखल घेत त्यांना आज धुळे येथे महापौर प्रतिभाताई चौधरी, प्रतिष्ठानचे अध्यक्ष बिपिन पाटील व पदाधिकारी गोरख देवरे ,एडवोकेट राकेश पाटील, प्रफुल पाटील यांनी सन्मानपत्र स्मृतिचिन्ह देऊन पुरस्काराने सन्मानित केले त्यांना मिळालेल्या पुरस्कारामुळे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *