1 min read

वेदांत शेलकर आय .आय टी प्रवेशासाठी ठरला पात्र

Loading

वेदांत शेलकर आय आय टी प्रवेशासाठी ठरला पात्र

राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी केला वेदांत व परिवाराचा सत्कार

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
माणसांच्या अंगी जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही, सतत अभ्यास भरपूर सराव याचे आधारे वेदांत आपले भविष्यातील स्वप्न पूर्ण करण्यासाठी जी अँडवान्स परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे व तो आयआयटी प्रवेशासाठी पात्र ठरला आहे.
सविस्तर माहिती अशी कि दहिवद ता अमळनेर येथील चि. वेदांत विकास शेलकर याची नुकतीच – भारतातील सर्वात उच्च अभियांत्रीकी शिक्षण देणारी केंद्र शासनाची संस्था (INDIAN INSTITUTE Of TECHNOLOGY) म्हणजेच आय.आय.टी (I.I.T) साठी संपूर्ण भारतातून JEE ADVANCE 23 AIR 13160 0BC 3162 रॅक मिळवून I.I.T प्रवेशासाठी पात्र ठरला आहे. त्याने – JEE MENS मध्ये 97.71% व MH-CET मध्ये 99.10% अतिरिक्त मिळवून हे यश संपादन केले आहे. चि. वेदांत हा पिंपळी येथील महात्मा फुले हायस्कूलचे कलाशिक्षक विकास शेलकर यांचे चिरंजीव आहेत.त्यांच्या या यशाबद्दल राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा मा.मंत्री अरुणभाई गुजराथी व नातेवाईक व मित्रमंडळी यांनी वेदांत व त्याच्या परिवाराचा सत्कार करून भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *