1 min read

सार्वजनिक विद्यालयात पालक शिक्षक संघ व संस्थे तर्फे गुणवंतांचा गौरव.

Loading

सार्वजनिक विद्यालयात पालक शिक्षक संघ व संस्थे तर्फे गुणवंतांचा गौरव.

असोदा – सार्वजनिक विद्यालय आसोदा येथे दहावी उत्तीर्ण झालेल्या प्रथम पाच विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सर्वोदय एज्युकेशन सोसायटी व पालक शिक्षक संघातर्फे गुणगौरव करण्यात आला. याप्रसंगी मंचावर संस्थेचे अध्यक्ष विलास दादा चौधरी,संचालक किशोर चौधरी,सुनील चौधरी, गोपाळ भोळे,
किशोर कोल्हे,दिलीप महाजन, मुख्याध्यापिका विद्या खाचणे,पर्यवेक्षक डॉ.मिलिंद बागुल व यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते. याप्रसंगी परिता पाटील, भाग्यश्री नारखेडे, मोहिनी महाजन, मैथिली चौधरी व जयेश कासार या यशस्वी विद्यार्थ्यांनी तसेच राजेश नारखेडे, इंदुबाई कासार या पालकांनी, संस्थेचे संचालक किशोर चौधरी,गोपाळ भोळे यांनी मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.तसेच आदिती कोल्हे,हेमांगी पाटील, विशाल गंगावणे या विद्यार्थ्यांनीही मनोगत व्यक्त करत यशस्वी होण्याची आश्वासन दिले.याप्रसंगी शाळेतील उपशिक्षक गोपाळ महाजन माध्यमिक शिक्षकांची पतपेढी भुसावळ येथे संचालक पदी निवडून आल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वृषाली चौधरी, प्रास्ताविक मंगला नारखेडे तर आभार शुभांगीनी महाजन यांनी मानले. कार्यक्रमास भावना महाजन, सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *