1 min read

प्रकल्प कार्यालयासमोरील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन यशस्वी.

Loading

प्रकल्प कार्यालयासमोरील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन यशस्वी.

अमळनेर प्रतिनिधी
एकात्मिक बाल विकास सेवा योजना चाळीसगाव प्रकल्प ०१ व ०२ मधील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मार्च २०२३ व एप्रिल २०२३ चे राज्य हिस्सा थकीत मानधन अदा करून अंगणवाडी कर्मचाऱ्यांची उपासमार थांबवावी आणि आयुक्त,एकात्मिक बाल विकास सेवा योजना बेलापूर नवी मुंबई यांच्या दि.३१ मे २०२३ तसेच दि. १६ जून २०२३ रोजीच्या आदेशानुसार दोन दिवसात थकीत मानधन अदा करावे यासाठी प्रकल्प कार्यालयासमोर संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन केले.
परिणामी दोन्ही प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याशी शिष्टमंडळाने सविस्तर चर्चा केली सदर चर्चेत प्रकल्प ०१ चे मानधन येत्या दोन ते दिवसात अदा करण्यात येईल असे लेखी संघटनेला देण्यात आली आणि प्रकल्प दोनचे थकीत मानधन दोन दिवसांपूर्वीच अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात आल्याचे लेखी दिले.
तसेच गणवेश, सादिल खर्च, मोबाईल रिचार्ज बिल, प्रोत्साहन भत्ता, प्रवास भत्ते बिल यासाठी लागणाऱ्या निधीची मागणी वरिष्ठ पातळीवर केली असल्याचेही लेखी उत्तर संघटनेला प्रकल्प कार्यालयांकडून देण्यात आले.
चर्चेत प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती सुनंदा चव्हाण,साधना कापडणी,संघटनेचे कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांच्यासह श्रीमती सुनंदा नेरकर,शारदा पाटील,योगिनी नाईक,संगिता पाटील,यमुना जाधव,अलका नाईक,सरला देशमुख,भारती पाटील,राणी जानेराव,रेखा गवारे,रंजना मोरे,रंजना कोष्टी यांनी भागिदारी केली.
चर्चा सकारात्मक झाल्याने धरणे आंदोलन मागे घेण्यात आल्याचे रामकृष्ण बी.पाटील यांनी जाहीर केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *