1 min read

नॉन क्रिमिलियर ची पोचपावती प्रवेशासाठी ग्राह्य धरा

Loading

नॉन क्रिमिलियर ची पोचपावती प्रवेशासाठी ग्राह्य धरा

भाजपाचे अनिल बोरनारे यांची उच्च व तंत्र शिक्षणमंत्र्यांकडे मागणी

मुंबई,ठाणे (मनिलाल शिंपी) दहावी बारावीनंतर उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र मिळेपर्यंत तूर्तास पोचपावती वर प्रवेश देण्यात यावा अशी मागणी भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक व प्रदेश कार्यकारिणी निमंत्रित सदस्य अनिल बोरनारे यांनी केली आहे
याबाबत अनिल बोरनारे यांनी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना निवेदन देऊन ही मागणी केली आहे.
दहावी व इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढील उच्च शिक्षणासाठी म्हणजेच डिप्लोमा तसेच इंजीनियरिंग फार्मसी एमबीबीएस बीएमएस बीएचएमएस बी डी एस अशा कोर्सला ऍडमिशन घेण्यासाठी नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्राची आवश्यकता असते राज्यातील हजारो पात्र विद्यार्थ्यांनी नॉन क्रिमिलियर साठी संबंधित विभागाकडे अर्ज केले आहेत. परंतू त्यांना प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत आहे. मागील वर्षी विद्यार्थ्याकडे नॉन क्रिमिलियर ला अर्ज करण्याची रिसिप्ट असेल तर ती तत्वता ग्राह्य धरली जायची व प्रवेश घेतल्यानंतर प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सदरचे प्रमाणपत्र प्रवेश मिळालेल्या कॉलेजमध्ये सादर करणे बंधनकारक असायचे मात्र यावर्षी १० वी नंतरच्या डिप्लोमा प्रवेशासाठी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट मागितले जात आहे अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांनी नॉन क्रिमिलियर साठी अर्ज केले आहेत पण प्रमाणपत्र मिळण्यासाठी विलंब होत आहे त्यामुळे ज्या एससी एनटी ओबीसी एसबीसी या संवर्गातील विद्यार्थ्यांचे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट नसल्यामुळे प्रवेश पात्र फॉर्म खुल्या संवर्गामध्ये स्वीकारले जाण्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने नॉन क्रिमिलियर ची पोचपावती ग्राह्य धरावी अशी मागणी अनिल बोरनारे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *