अमळनेरला कंजरभाट समाजातील नितेश झाला एमबीबीएस ..
![]()



अमळनेरला कंजरभाट समाजातील नितेश झाला एमबीबीएस ..
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
घरची परिस्थिती बेताची असल्याने मुलांना शिकवावे कसे आणि पोटाची खळगी कशी भागवावी असा प्रश्न ज्या कुटुंबाला सतत पडलेला असायचा त्याच कुटुंबातील मुलगा आज एमबीबीएस झाला हि गोष्ट अभिमानस्पद आहे.
सविस्तर माहिती अशी कि सर्वसामान्य कुटुंबातून डॉक्टर नितेश मांछरे M..B.B.S ची पदवी रशिया येथे steat medical academy रशिया विद्यापीठ येथे मिळवली.आई-वडिलांचे कष्ट डोळ्यासमोर ठेवून अतिशय जिद्दी व चिकाटीने आपले व आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण केले लहानपणापासूनच आई-वडिलांच्या स्वप्न होते मुलाला डॉक्टर बनवायचं होत ते आज सत्यात उतरले आहे.
नर्सरी पासून तर बारावीपर्यंत शरद पवार इंटरनॅशनल स्कूल कळवण येथे डॉक्टर नितेश माछरे यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं …. त्यानंतर जिद्द व चिकाटीने कंजर भाट समाजासमोर एक नवीन आदर्श निर्माण केला, व या समाजासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे अमळनेर हे संतांची भूमी आहे या भूमीतून या समाजातील हा दुसरा M.B.B.S डॉक्टर झालेला आहे. रशिया krygyz state medical academy या विद्यापीठात त्याने आपली एमबीबीएस ची डिग्री डॉक्टर नितेश माछरे यांनी प्राप्त केली
एकीकडे समाजातील लोकांना अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा भागवण्यासाठी जीवाचे रान करावे लागत आहे आजही समाजातील काही कुटुंबाची ही परिस्थिती आहे पण त्या परिस्थितीलाही न घाबरता आपल्या मेहनतीच्या बळावर राजेश माछरे यांनी दिवस रात्र एक करून आपल्या मुलाला शिक्षण घेण्यासाठी भरपूर प्रयत्न केले आणि आज त्यांच्या स्वप्नांना खरोखर रंग मिळाले …. त्यांच्या वडिलांसाठी ही फार अभिमानाची गोष्ट आहे सहा वर्ष रशिया येथे आपल्या फॅमिली पासून दूर राहून तो यश मिळविले.
व कोरोना काळात डॉक्टर अनिल शिंदे यांच्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी एक वर्ष प्रॅक्टिस देखील केली व रुग्णांना धीर देण्याचा देखील काम केलं
आज रोजी तो घरी परतला व संपूर्ण
कंजरभाट समाज युवाशक्ती बहुउद्देशीय संस्था मार्फत त्याचा जाहीर सत्कार करण्यात आला खरोखर कंजर भाट समाजासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे…

