ॲड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल येथे योग दिन साजरा
![]()


ॲड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल येथे योग दिन साजरा
अमळनेर :- ॲड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल येथे विद्यार्थ्यांन सह प्राचार्य,शिक्षक यांनी सोबत योगा करत जागतिक योग दिवस साजरा केला. शाळेसाठी जागतिक योग दिन हे निमित्त असून शाळेत नेहमी विद्यार्थ्यांना योग प्रशिक्षण दिले जाते. प्राचार्य विकास चौधरी यांनी योगा करणे हे दैनंदिन जिवनात किती आवश्यक आहे व त्याचे फायदे याचे मार्गदर्शन केले. क्रिडा शिक्षक केदार देशमुख सर व अजय पाटील सर यांनी योग शिबिराचे उत्कृष्ट आयोजन केले व या शिबिरात सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.

