अमळनेरला गुणवंताचा सत्कार, प्रेरणादायी व्याख्यान
![]()





अमळनेरला गुणवंताचा सत्कार, प्रेरणादायी व्याख्यान
अमळनेर- येथील रुख्मिणीताई कला व वाणिज्य महिला महाविद्यालयात तालुक्यातील सर्व १२ वी कला शाखेतील उत्तीर्ण झालेल्या मुलींचा सन्मान करण्यात आला. प्राचार्य डॉ एस जे शेख हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील, संस्थेचे प्रशासकीय व विकास अधिकारी प्रा श्याम पवार, मानद शिक्षण संचालक प्रा सुनिल गरुड, शिवाजी ज्यु. कॉलेजचे प्राचार्य एम. ए. पाटील, गायकवाड ज्यु. कॉलेजचे प्राचार्य ए. व्ही. नेतकर, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक उमेश काटे, युनिक अकॅडमी चे साळुंखे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक उमेश काटे यांचे “एमपीएससी, यूपीएससी परीक्षेचे अभ्यासतंत्र” या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान झाले. युनिक अकॅडमी तर्फे महाविद्यालयाला स्पर्धा परीक्षेतील उपयुक्त पुस्तकांचा संच भेट स्वरूपात देण्यात आला. प्रा सुनील गरुड, ए व्ही नेतकर, प्रा शाम पवार यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ एस जे शेख यांनी प्रास्ताविक, प्रा डॉ मंजूषा खरोले यांनी सूत्रसंचालन तर प्रा डॉ अमोल दंडवते व प्रा डॉ सारीकाबेन पाटील यांनी आभार मानले.

