राज्यातील आयटीआय निदेशकांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची मंत्री लोढा यांचासोबत चर्चा
![]()
राज्यातील आयटीआय निदेशकांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची मंत्री लोढा यांचासोबत चर्चा


मुंबई, ठाणे( मनिलाल शिंपी ):महाराष्ट्र राज्यातील आयटीआय निदेशक, व टेक्निकल शिक्षकांच्या शैक्षणिक मागण्यासाठी काल कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार माननीय श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी कौशल्य विकास मंत्री नामदार श्री. मंगल प्रभात लोढा साहेब त्यांची भेट घेऊन खालील विषयांवर चर्चा केली बच शिक्षण संघर्ष समितीच्याबच शिक्षण संघर्ष समितीच्या अध्यक्षा सौ संगीता शिंदे ताई, आयटीआय संघटनेचे अध्यक्ष माळी सर, उपाध्यक्ष विनोद पाटील सर उपस्थित होते*
1) तासिका तत्त्वावर नेमलेल्या आयटीआय शिक्षकांना संरक्षण देऊन, त्यांना पुढील सेवेत कायम करावे, सेवेत कायम करण्याचे आदेश मंत्री महोदयांनी अधिकाऱ्यांना दिले
2) अल्पसंख्यांक निदेशकांचे पगार 6 महिन्यापासून झालेले नव्हते, तात्काळ पगार व्हावेत अशी मागणी केली, मंत्री महोदयांनी सदर अल्पसंख्याक विभागास कळवले आहे.
तसेच गेल्या 40 वर्षापासून वर्ग दोन चे आर आर प्रलंबित होते याकरता आमदार सरांनी सातत्याने पाठपुरावा केला असून येत्या तीन ते चार दिवसांमध्ये वर्ग दोन चे आर आर मंजूर होऊन लवकरच त्याचा शासन आदेश जाहीर करण्यात येईल असे सांगितले.

