1 min read

विविध शैक्षणिक विषयांवर चर्चा करण्यासाठी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची शिक्षण सचिव यांची भेट

Loading

विविध शैक्षणिक विषयांवर चर्चा करण्यासाठी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची शिक्षण सचिव यांची भेट

ठाणे कल्याण (मनिलाल शिंपी)महाराष्ट्र राज्यातील काही ज्वलंत प्रश्न सुटावेत म्हणून कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर व शिक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष सौ संगीताताई शिंदे यांनी विभागातील सचिव माननीय श्री रंजीत सिंह देओल यांची काल मंत्रालयात भेट घेतली
1) 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त असल्या मृत व सेवानवृत्तत कर्मचाऱ्यांना उपदान व अन्य लाभ मिळून पेन्शन सुरू बाबत तात्काळ पत्र काढावे असे निवेदने देण्यात आले
जुनी पेन्शनबाबत मुख्यमंत्र्यांकडे झालेल्या बैठकीच्याा बाबतीत, आढावाही घेण्यात आला
2) उच्च माध्यमिक मधील वाढीव पदांना मान्यता मिळण्यासाठी शिक्षण संचालक यांच्याकडून माहिती मागवली, सदर माहिती कशा प्रकारची असेल याविषयी चर्चा केली
3) शेवटच्या वर्गाची पटसंख्या कमी झालेली आहे अशा शाळांना अनुदानाची संधी द्यावी
4) 3331 हेड अंतर्गत असलेल्या शाळांना दोन महिन्यापासून पगार अनुदान मिळाले नाही , त्वरित मिळावे
5) ज्या अधिकाऱ्यांनी 6 फेब्रुवारी 2023 च्या शासन निर्णयाप्रमाणे अनुदानाचे आदेशांना दिली नसतील त्यांची चौकशी करावी
6) संच मान्यता दुरुस्ती पुण्यात अनेक वर्षापासून पेंडिंग आहे, त्याकडे अधिकारी वर्ग दुर्लक्ष करीत आहे, अनेक शाळांची कामे रखडलेली सर्व, त्याबाबत चौकशी करावी अशी मागणी केली
7) फायनल संच मान्यता त्वरित शाळांना उपलब्ध करूनून द्याव्यात
8) आरटीई अंतर्गत 25% प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांचे प्रतिपूर्ती शुल्क मिळावे
9) ज्या शाळांचे मूल्यांकन प्रस्ताव पुण्यामध्ये प्रलंबित आहेत , त्यांची यादी घोषित करून अनुदान जाहीर करावे
*असेच काही वैयक्तिक विषय होते त्यांच्यावरही शिक्षण सचिव महोदयांशी चर्चा केली.अशी माहिती
विष्णू विशे यांनी सविस्तर दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *