1 min read

शिंपी समाजाचा आर्थिक आणि सामाजिक विकास करण्यासाठी सर्वांनी संघटित होण्याची गरज आहे: वणेश खैरनार

Loading

शिंपी समाजाचा आर्थिक आणि सामाजिक विकास करण्यासाठी सर्वांनी संघटित होण्याची गरज आहे: वणेश खैरनार

नाशिक येथे श्री क्षत्रीय अहीर शिंपी समाज भव्य वधुवर परिचय मेळावा संपन्न

समाजात सामुदायिक विवाह आयोजित करावेत,त्याचा खर्च मानवसेवा हीच ईश्वरसेवा ग्रुप तर्फे करण्यात येईल.:: डॉ. मनिलाल शिंपी

नाशिक ( प्रतिनिधी)श्री क्षत्रीय अहीर शिंपी समाज सिडको,लक्ष्मीधवल समाज मंदीर आयोजीत भव्य राज्यस्तरीय वधु-वर पालक मेळाव्यास अभुतपुर्व प्रतिसाद देवून संपन्न झाला.कार्यक्रमाची सुरुवात कु. कावेरी नितिन रोझेकर यांच्या मधुर स्वागतगीताने झाली .व्यासपीठावर स्वागताध्यक्ष शेखरजी निकुंभ यांनी कार्यक्रमाचे दिपप्रज्वलनाने उदघाटक-सुधाकरभाऊ बडगुजर प्रतिमा पुजन-समाजाध्यक्ष वनेशभाऊ खैरनार,स्मरणिका प्रकाशन-नानासाहेब नेरे .प्रमुख पाहचणे-विजुनाना बिरारी,आर.एस.पी .युनिट कमांडर, मानवसेवा हीच ईश्वरसेवा ग्रुपचे अध्यक्ष डॉ.मणिलाल शिंपी,राजेंद्र भाऊ वाडीकर,वरिष्ठ पोलीस निरिक्षक अंबड पोलीस स्टेशन-सुरज भिजली साहेब.अखिल भारतीय महीला आघाडी अध्यक्षा-सुषमाताई सावळे,माजी अध्यक्षा-वंदनाताई जगताप,योगगुरु-प्रज्ञा पाटील, युवाध्यक्ष-रुपेश बागुल ,माजी युवाध्यक्ष प्रमोद शिंपी.महेंद्रशेठ बाविस्कर,माजी समाजाध्यक्ष-डी.व्ही.दादा बिरारी.
बापुसाहेब निकुंभ,सुनिलजी गवादे.राजेश जगताप,मारुती वेफर्स,निरज शेळके,अतुल नेरपगार,दिलीप बिरारी, रमेश चव्हाण ,
गंगापुर रोड,महात्मा नगर मंडळ.विठ्ठल मंदीर विश्वस्त,नाशिकरोड मंडळ.संजीव भांडारकर,प्रशांत कापडणे,सुनिता ताई शिंपी आदी मान्यवरांनी भेटी दिली.
यावेळी एकुण ६०० वधु-वरांची नोंद झाली.मेळाव्यास मार्गदर्शन करतांना सुधाकर भाऊंनी लक्ष्मीधवल समाज मंडळाची एकी व कामकाजाची पद्धत वाखाणण्यासारखी आहे.या शब्दात अभिनंदन आणि कौतुक केले.मानवसेवा हीच ईश्वरसेवा ग्रुपचे अध्यक्ष, आर एस पी युनिट कमांडर डॉ. मनिलाल शिंपी यांनी वधुवर परिचय मेळाव्यास शुभेच्छा देताना सांगितले की, समजमध्ये सामुहिक विवाहाचे आयोजन करावे-प्रत्येक जोडप्याला कपडेलत्ते,दागीने, मिरवणुक,मिष्ठान्न भोजनाचा संपुर्ण खर्च आम्ही करु.तसेच समाजातील गरजु विद्यार्थ्यांना मोफत संगणक ,पुस्तके, गणवेश,शालेयवस्तु ,आरोग्य सुविधा याबाबत मदत देवु तसेच संस्थेच्या प्रस्तावित पांच मजली इमारतीसाठी सेवाभावी ट्रस्ट कडून भरघोस मदत मिळवु देवु.
मा.नेरे नानांनी प्रस्तावित इमारती साठी ५लाखाची मदत जाहीर केली.मा.राजेंद्रभाऊ वाडीकर यांनीही भरघोस मदतीचे मान्य केले.मा.वनेशभाऊंनी. संस्थेचे कामकाज आणि कार्यकर्त्यांचे कौतुक केले.मा. विजुनाना बिरारी समाजाचा खरपुस समाचार घेवून
वधुवरांना योग्य मार्गदर्शन केले.वेळे अभावी सुषमा ताईंनी वधुवरांना शुभेच्छा दिल्या.स्वागताध्यक्ष -शेखर निकुंभ यांनी पाहुण्यांचे स्वागत व सत्कार करुन आमच्या विनंतीला मान देऊन आलात त्याबद्दल आभार मानले. संस्थेच्या कार्याची ,उपक्रमांची समाजाला माहीती दिली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यकारीणी,महीला मंडळ यांनी खुप मेहनत घेतली.
विषेश जबाबदारी शेखर निकुंभ सुभाष बेंडाळे, अजय खैरनार, दिपक कापडणीस पुंडलीक खैरनार, शांताराम बाविस्कर, सुरेश सोनवणे, भागवत बोरसे,सुधाकर सोनवणे,अरुण महाले,रवी जाधव शुभम टेलिकॉम चे जाधव बंधू,
सुनिल गांगुर्डे,अरविंद बोरसे दिगंबर गवांदे,मनोहर कापडणे,शशिकांत मांडगे,रमेश बागुल नविन सदस्य महाले,बेंडाळे ,रविराज,
प्रतिभाताई बिरारी ,सुनिता ताई शिंपी आणि त्यांचे सहकारी यांनी घेतले.
एकंदरीत मेळावा सर्वांगसुंदर झाला.आलेल्या वधुवर व पालकांच्या प्रतिक्रीया व अभिप्राय आम्हाला प्रेरणादायी आहेत .राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *