1 min read

कल्याण वाहतूक एसीपी मंदार धर्माधिकारी यांचा स्तुत्य उपक्रम, . रासायनिक केमिकल मुळे अपघात नियंत्रण विषयावर कल्याण येथे कार्यशाळा संपन्न. (रासायनिक केमिकल अपघाताचा ठिकाणी वाघाची शिकार करण्याचा तयारीने जावे. :: प्रतिक भैसास

Loading

कल्याण वाहतूक एसीपी मंदार धर्माधिकारी यांचा स्तुत्य उपक्रम, . रासायनिक केमिकल मुळे अपघात नियंत्रण विषयावर कल्याण येथे कार्यशाळा संपन्न. (रासायनिक केमिकल अपघाताचा ठिकाणी वाघाची शिकार करण्याचा तयारीने जावे. :: प्रतिक भैसास

ठाणे,कल्याण ( मनिलाल शिंपी ):कल्याण, डोंबिवली,उल्हासनगर वाहतूक शाखेअंतर्गत ,एसीपी मंदार धर्माधिकारी यांचा अध्यक्षतेखाली,आणि अचिव्हर्स महाविद्यालयाचे संस्थापक प्राचार्य आदरणीय भिवंडीकर सर, यांचा प्रमूख उपस्थितीत रासायनीक केमिकल तज्ञ श्री.प्रदीप भैसास यांचे व्याख्यान अचिव्हर्स कॉलेज, कल्याण पश्चिम येथे आयोजित करण्यात आले होते.रस्ता सुरक्षा व रासायनिक केमिकल मुळे होणाऱ्या अपघातांवर प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी, आणि असे अपघात झाल्यास त्यासाठी कोणती काळजी, खबरदारी घ्यावी,तसेच ज्वलनशील रसायन वाहतूक करणाऱ्या वाहन चालकाला अपघाताचा प्रसंग आल्यास बाचावपूर्व प्रशिक्षण देणे आवश्यक आहे, तसेच रसायन वाहतूक करणाऱ्या ट्रक, कंटेनर, ला परिवहन विभाग परवाना आहे की नाही तपासणे आवश्यक आहे. त्यामुळे केमिकल गळतीमुळे होणारे दुष्परिणाम आणि रस्त्यावर होणाऱ्या अपघातांचे प्रमाण कमी होईल. व परिसरात कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा इतर आपत्ती बाबत विपरीत परिणाम होणार नाही याबाबत नियोजन करणे सोपे होते,अशी माहिती रासायनिक केमिकल तज्ञ प्रदीप भैसास यांनी विशेष माहिती दिली.त्यानंतर कोळसेवाडी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्षिरसागर , वरिष्ठ पोलीस निरीक्षक गीते आणि उल्हासनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी रासायनिक केमिकल वाहतुकीमुळे होणाऱ्या अपघातात बचाव करणे कसे सोपे होईल याबाबत सविस्तर माहिती चर्चेद्वारे जाणून घेतली. पोलीस निरीक्षक गिरीश बने शहर वाहतूक शाखा कल्याण पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र क्षीरसागर वाहतूक उपशाखा कोळशेवाडी वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गीते शहर वाहतूक उपशाखा डोंबिवली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गायकवाड,उल्हासनगर शहर वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक आजगावकर शहर वाहतूक शाखा अंबरनाथ, विठ्ठलवाडी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुधाकर खोत, कल्याण पश्चिम वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक श्री भालेराव, आर एस पी अधिकारी युनिट चे डॉ. मनिलाल शिंपी, जितेंद्र सोनवणे, शरद बोरसे, भगवान परदेशी, बबन पाटील,उपस्थित होते, संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी करण्यासाठी आर एस पी अधिकारी युनिट कमांडर डॉ. मनिलाल शिंपी यांनी सहकार्य केले, रस्ता सुरक्षा,कार्यशाळा आयोजित करून ती यशस्वी करण्यासाठी वाहतूक शाखेचे सतीश चौधरी ,श्रीमती शिंदे,चंद्रकांत जाधव, हे. काँ.कारोटे मेजर यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच सर्व कर्मचारी वर्ग आणि ट्रॅफिक वॉर्डन यांनीही मोलाचे सहकार्य केले.वाहतूक विभाग कल्याण एसीपी मंदार धर्माधिकारी यांनी रासायनीक केमिकल तज्ञ प्रदीप भैसास आणि महाविद्यालयाचे संस्थापक प्राचार्य, भिवंडीकर सरांचे विशेष आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *