जि प शाळा भूपेशनगर ता.शिरपूर जि.धुळे येथे आज शाळा शुभारंभ व शाळा पूर्वतयारी मेळावा
![]()


आज दि.15 जून 2023 रोजी जि प शाळा भूपेशनगर ता.शिरपूर जि.धुळे येथे शाळा शुभारंभ व शाळा पूर्वतयारी मेळावा क्र.2 मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सदर प्रवेशोत्सव कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन अध्यक्ष श्री. ढेमा सुरेश पावरा,गावातील प्रतिष्ठित व्यक्ती दिनेश भावसिंग पावरा, जगन वारसिंग पावरा ,बाटीबाई दिलीप पावरा तसेच शाळेत नव्याने बदली होऊन रुजू झालेले श्री.प्रवीणकुमार धोटे सर व मेघा शशिकांत हिंगोणेकर मॅडम व इतर ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते. इ.1ली त दाखल झालेल्या विद्यार्थ्यांची बैलगाडी वरून मिरवणूक काढण्यात आली. शाळेत सर्व दाखल पात्र विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.शाळा पूर्व तयारी मेळावा क्र.2 चे आयोजन करण्यात आले.शालेय व्यवस्थापन अध्यक्षांच्या हस्ते फीत कापून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले..विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गोड पदार्थ जिलेबीचे वाटप करण्यात आले.कोणतीही भौतिक सुविधा नसलेल्या एका साध्या कुडाच्या झोपडीत भरत असलेल्या शाळेत शाळा शुभारंभ, प्रवेशोत्सव व शाळा पूर्व तयारी मेळावा मोठा आनंदात व खेळीमेळीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक श्री.प्रवीणकुमार धोटे सर यांनी केले व श्रीमती.मेघा शशिकांत हिंगोणेकर मॅडम यांनी सर्व उपस्थित मंडळीचे शब्दसुमनाने आभार मानले.

