लंडनमधील एक क्षण अभिमानाचा-शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे
![]()



लंडनमधील एक क्षण अभिमानाचा
— शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे *मुंबई,ठाणे( मनिलाल शिंपी):भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडनमध्ये घर होते ऐकून होतो, लंडनमध्ये पोहोचल्या पोहोचल्या कुटुंबासमवेत माझा बालपणीचा मित्र ललित सूर्यवंशी च्या अनमोल मदतीने बाबासाहेबांच्या घराला भेट देण्याचा संधी मिळाली, भारतातून प्रदेशात आल्यानंतर माझ्या बाबासाहेबांचा पुतळा आणि घर पाहून भारतीय नागरिक असल्याचा अभिमान वाटला. ज्या महामानवाने भारतीय नागरिकाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, अन्यायविरुद्ध सतत लढत राहिले, त्या महान व्यक्तीच्या परदेशा मधील जपलेल्या स्मृती पाहून आनंद द्विगुणीत झाला* *बाबासाहेबांच्या घरात गेल्यानंतर एखाद्या पुरातन काळातील सुंदर आणि पवित्र वास्तूमध्ये आल्याचा अनुभव लाभला, बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होऊन , त्या घरामध्ये बाबासाहेबांनी वापरलेल्या जुन्या वस्तू , बाबासाहेबांचा चष्मा , पुस्तक ,पेन,बाबासाहेब झोपत असलेले पलंग, वापरत असलेली खुर्ची, टेबल, जुन्या काळातील फोटो, आणि जतन करून ठेवलेल्या वस्तू पाहावयास मिळाल्या, बाबासाहेबांच्या घराचे देखरेख करण्याकरता शासनाकडून दोन व्यक्तींची व्यवस्था केलेली आहे* *माझ्या लंडन प्रवासा मधील सर्वात आनंदाचा आणि अभिमानाचा तो क्षण होता, सातासमुद्रापलीकडे बाबासाहेबांचे काम आज ही अजरामर आहे. प्रत्येक भारतीय नागरिकांनी लंडनमध्ये गेल्यानंतर आपल्या महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या घराला जरूर भेट द्यावी.

