गणित अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदी प्रथम महिला प्रा. डॉ. विद्या शर्मा तर विद्या शाखेवर प्राचार्य डाॅ. वासूदेव पाटील यांची निवड
![]()


गणित अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदी प्रथम महिला प्रा. डॉ. विद्या शर्मा तर विद्या शाखेवर प्राचार्य डाॅ. वासूदेव पाटील यांची निवड
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
आज दि. 13/06/2023 रोजी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात पार पडलेल्या गणित अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. विद्या अनंत शर्मा यांची सर्वानुमते निवड झाली तदनंतर प्रा. डॉ. विद्या अनंत शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली विद्या शाखेवर प्रा. डाॅ. वासुदेव आर. पाटील यांची निवड झाली आणि अभ्यास मंडळावर स्विकृत सदस्य म्हणून प्रा. डाॅ. वाय. एस. सोळंके, प्रा. डॉ. एस, आर, भोयर, प्रा. डाॅ. आर. एम. डायघुडे, प्रा. डाॅ. कल्पना पवार व इतर विद्यापीठाचे प्रा. डॉ. ज्ञानेश्वर डी. पवार व 48/3 वर पीजी मधून प्रा. डाॅ. गणेश यु. खापेकर तर युजी मधून प्रा. डाॅ. सरोज कुभांरे यांची निवडणूक प्रक्रियेतुन निवड झाली. सर्वांचे शिक्षण मंच परिवारा तर्फे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
सर्व गणित अभ्यासमंडळ सदस्य प्रा. डाॅ. वासुदेव पाटील, प्रा. डाॅ. गणेश खापेकर, प्रा. डाॅ. अश्विना रंगारी, प्रा. डाॅ. सरोज कुभांरे यांचे मनपूर्वक आभार व विद्यापीठ प्रशासनाच्या सहकार्याबाबत विशेष आभार मानण्यात आले.अभिनंदन
प्रा. डाॅ. सुनिल आखरे,अध्यक्ष विभागीय शिक्षण मंच,प्रा. डाॅ. दिनेश सातंगे,
महामंत्री, विभागीय महामंत्री शिक्षण मंच व अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ शिक्षण मंच यांनी अभिनंदन केले.
प्राध्यापक डॉ वासुदेव पाटील यांच्या निधीबद्दल कळमसरे येथील सर्व मित्र परिवार, समाज बांधवांनी अभिनंदन केले आहे..

