अमळनेरला काही समाजकंटकांकडून शांततेचा भंग केल्याप्रकरणी12 जुन पर्यंत संचारबंदीचे आदेश
![]()


अमळनेरला रात्री मुलांच्या भांडण्यातून दोन गटात दगडफेक
अमळनेरला काही समाजकंटकांकडून शांततेचा भंग केल्याप्रकरणी12 जुन पर्यंत संचारबंदीचे आदेश
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
दि. 09/06/2023 रोजी रात्री 9.00 वाजता अमळनेर शहरात काही समाजकंटकांनी दगडफेक केली त्यामुळे दोन समाजातील लोक आपसात भिडले व परस्परांवर दगडफेक करण्यात आली.
सदरची दगडफेक झाल्याची खात्री झालेली असल्याने अमळनेर शहरात शांतता भंग झाली आहे. तसेच शहरात
कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी व जनजीवन सुरळीत राहावे या करीता फौजदारी प्रकीया संहिता 1973 चे
कलम 144 अन्वये संचारबंदी लागू करणे आवश्यक असल्याबाबत माझी खात्री झालेली आहे.त्याअर्थी मी कैलास कडलग, उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अमळनेर भाग
अमळनेर फौजदारी प्रकीया संहिता 1973 चे कलम 144 (1)(2) व (3) अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या
अधिकाराचा वापर करुन अमळनेर शहरात दि. 10/06/2023 रोजीच्या सकाळी 11.00 वाजेपासुन ते
दि. 12/06/2023 रोजीच्या सकाळी 11.00 वाजेपावेतो संचारबंदी आदेश लागू करीत आहे.
अमळनेर शहरात शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित राखणे बाबतचे गांभिर्य लक्षात घेता, वेळे
अभावी संबंधितांना पुरेशी संधी देणे शक्य नसल्याने फौजदारी प्रकीया संहिता 1973 चे कलम 134 मधील
प्रक्रिया पुर्ण करता येत नसल्याने कलम 144 (2) अन्वये हा आदेश एकतर्फी लागू करण्यात येत आहे.सदरील आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित व्यक्ती/ संस्था/ संघटना यांचे विरुध्द प्रचलित कायद्यात नमुद केल्यानुसार कायदेशिर कारवाई करणेत येईल.
सदरचा आदेश हा अत्यावश्यक सेवा उदा. शासकीय दौरे, शासकीय कर्तव्यावर हजर अधिकारी,कर्मचारी, पोलिस, रुग्णसेवा, दुध व पाणीपुरवठा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, तसेच शहरातील
सरकारी/खाजगी बँक / पतसंस्था, विवाह व अंत्यविधी यांना लागू राहणार नाही.
सदरचा आदेश दिनांक 10/06/2023 रोजी माझ्या सही व शिक्यानिशी पारीत केला असे.
अमळनेर व दंडाधिकारी भाग, अमळने
जि. जळगांव कैलास कडलग
उपविभागीय दंडाधिकारी तथा
उपविभागीय अधिकारी अमळनेर यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

