1 min read

केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले उद्या दि.9 जुन रोजी चर्नीरोड येथील दलित मुलीची हत्या झालेल्या सावित्रीबाई फुले मुलींच्या वसतिगृहात भेट देणार

Loading

केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले उद्या दि.9 जुन रोजी चर्नीरोड येथील दलित मुलीची हत्या झालेल्या सावित्रीबाई फुले मुलींच्या वसतिगृहात भेट देणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) – मुंबईतील सावित्रीबाई फुले मागासवर्गीय मुलींचे वसतिगृहामधील एका दलित मुलीवर बलात्कार करुन हत्या झाल्याचा निषेधार्ह प्रकार नुकताच घडला. त्या प्रकरणाची माहिती मिळताच उद्या शुक्रवार दि. 9 जुन रोजी दुपारी 1वाजता रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले हे चर्नीरोड येथे सावित्रीबाई फुले मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहातील घटनास्थळी भेट देवून पाहणी करणार आहेत. तसेच यावेळी बळीत दलित मुलीच्या कुटुंबियांचीही ना. रामदास आठवले सात्वंनपर भेट घेणार आहेत.

दलित विद्यार्थीनीवर बलात्कार करुन तिची निर्घुण हत्या करण्यात आली. आणि संशयित आरोपी हा येथीलच कर्मचारी असुन त्यानेही आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. या गंभीर प्रकरणाची एकुण सखोल चौकशी झाली पाहिजे. रिपब्लिकन पक्षाच्या वतीने या घटनेचा तिव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. दलित मुलीवर अत्याचार आणि तिचा खुन ही अत्यंत गंभीर बाब असुन त्याबाबत सखोल चौकशी झाली पाहिजे. रिपब्लिकन पक्षाच्या वतीने या घटनेचा तिव्र धिक्कार आणि निषेध व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणाची दखल घेवुन ना. रामदास आठवले हे उद्या घटनास्थळाला दुपारी 1 वाजता भेट देणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *