1 min read

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाची पात्रता दिनांक ३०जून २०२४ पर्यंत वाढवावी.
जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेची मागणी.

Loading

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाची पात्रता दिनांक ३०जून २०२४ पर्यंत वाढवावी.
जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेची मागणी.

जळगाव: महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या वतीने राज्यात एकाच वेतनश्रेणीत सलग १२/२४ वर्षे पूर्ण झालेल्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांसाठी वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. गेल्या वर्षापासून सदर प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने सशुल्क स्वरूपात देण्यात येत असून यंदाच्या वर्षी देखील सदर प्रशिक्षणासाठी पात्र शिक्षकांनी दि.१२ जून २०२३पर्यंत नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आलेले असून सदर प्रशिक्षणासाठी ३१मार्च २०२४ अखेर ज्यांच्या सेवेस १२ आणि २४वर्षे पूर्ण होणार आहेत असेच शिक्षक पात्र ठरणार आहेत. मात्र राज्यात शैक्षणिक वर्षाची सुरुवात जून महिन्यात होत असून बहुतांश ठिकाणी नवीन नियुक्ती शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासून म्हणजेच जून महिन्यापासूनच होत असल्याकारणाने ३१ मार्च २०२४च्या अटीमुळे जे शिक्षक जून महिन्यामध्ये सेवेत दाखल झालेले आहेत, अशा शिक्षकांनाअवघ्या दोन महिन्याच्या फरकामुळे प्रशिक्षणाची संधी मिळणार नसल्याने एससीईआरटीद्वारा ३१मार्च २०२४ ही अंतिम तारीख ३०जून २०२४ पर्यंत वाढविल्यास राज्यातील असंख्य शिक्षक बंधू – भगिनींना सदर प्रशिक्षण पूर्ण करता येऊन वेळेत आर्थिक लाभ मिळू शकेल. तरी सदर मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून पात्रता अंतिम तारीख ३१मार्च २०२४ ऐवजी ३० जून २०२४ अशी करावी अशी रास्त आणि माफक मागणी जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या वतीने प्रा. नंदन वळींकार (अध्यक्ष), प्रा.सुनील सोनार (सचिव) प्रा.डॉ. अतुल इंगळे, प्रा.गजानन वंजारी (उपाध्यक्ष) प्रा.सुनील गरुड, प्रा.डी. डी.पाटील (जेष्ठ मार्गदर्शक), प्रा.शैलेश राणे प्रा.सुनील पाटील (कार्याध्यक्ष) प्रा.राहुल वराडे (जळगाव महानगराध्यक्ष) प्रा.राजेश कोष्टी (महानगर सचिव) यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *