25 व्या लग्नाच्या वाढदिवशी केला गुणवंतांचा गुणगौरव
![]()
25 व्या लग्नाच्या वाढदिवशी केला गुणवंतांचा गुणगौरव
अमळनेरातील भामरे परिवाराचा स्तुत्य उपक्रम,सोबत पालक व शिक्षकांचाही सत्कार


अमळनेर-लग्नाचा वाढदिवस म्हणजे सेलिब्रेशन, पार्टी किंवा पिकनिक टूर काढण्याची प्रथा सध्या रूढ असताना अमळनेर शहरातील लग्नाला 25 वर्ष पूर्ण झालेल्या एका आदर्श दाम्पत्याने आपल्या लग्नाच्या वाढदिवशी 10 वी व 12 वी तील गुणवंत विद्यार्थ्यांचा मोठा सत्कार सोहळा आयोजित करून गुणवंतांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला.
सुनिल चंद्रकांत भामरे व सौ सोनाली सुनिल भामरे असे या आदर्श दाम्पत्याचे नाव असून सुप्रसिद्ध रेशम पावभाजी या फर्म चे संचालक असलेल्या या दाम्पत्याने या कार्यक्रमानिमित्त आलेले सर्व विद्यार्थी, पालक आणि आणि शिक्षक वृंद व मित्र परिवारास कोणताही चार्ज न स्विकारता अतीशय आग्रहाने पावभाजीचा आस्वाद देखील दिला.या अनोख्या कार्यक्रमाची विशेष चर्चा शहरभर झाली. मारोती मंदिरासमोर रेशम परिवारातर्फे आयोजित या कार्यक्रमात 10 वी आणि 12 वी तील सर्व शाळांमधील प्रथम आलेले विद्यार्थी व विद्यार्थीनी तसेच समाजाचे इतर विद्यार्थी यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मान पत्र व पेन देण्यात आले,तसेच मंगळग्रह मंदीरातर्फे वाॅटर बॅग व खा शि मंडळाचे संचालक हरी भिका वाणी यांच्याकडून प्रत्येकी 100 रू पाकीट बक्षीस म्हणून देण्यात आले,सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मंगळग्रह संस्थेचे अध्यक्ष डीगंबर महाले तर प्रमुख अतिथी हरी भिका वाणी , विनोद कोठावदे ,माजी नगरसेवक विक्रांत पाटील,बबली पाठक मंगळग्रह संस्थेचे विश्वस्थ श्री बहिरम,मुख्याध्यापिका सौ बोरसे, सौ गायत्री भदाणे यासह मान्यवर उपस्थित होते.सर्व गुणवंत आणि पालक व शिक्षकांच्या सत्कारानंतर विद्यार्थी व पालकांनी मनोगत व्यक्त करत या उपक्रमाबद्दल आयोजकांचे आभार व्यक्त केले.
भामरे परिवाराकडे देण्याची वृत्ती,, अध्यक्षीय मनोगतात डिगंबर महाले म्हणाले की सुनिल भामरे यांच्याकडे देण्याची वृत्ती आहे,म्हणून लग्नाच्या वाढदिवसाला समाजासाठी ते काहीतरी चांगले करू शकले,आज त्यांनी गुणवंतांचा सन्मानच नव्हे तर सोबत मोठ्या मनाने पावभाजी मोफत देऊन आत्माही तृप्त केला आहे,यापुढेही भामरे परिवाराकडून समाजाच्या खूप अपेक्षा आहेत,आज ज्या विद्यार्थी मित्रांनी देखील यश संपादन केले त्यांनी आता भविष्यासाठी प्रयत्न वाढवावेत,आता तुम्हाला कुणीही रोखू शकणार नाही,तुमच्या कीर्तीचा सुगंध संपूर्ण श्रुष्टीत होईल या शब्दात त्यांनी शुभेच्छा दिल्या.
गजानन धांडे, मिलींद वैद्य यांनी देखील मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रकाश मेखा ,राजेंद्र मोराणकर व विनोद अमृतकार यांनी केले.यावेळी मनोहर महाजन सर , शाम नेरकर ,दिलीप सोनवणे ,चद्रंकांत भदाणे,रिषभ पारेख, पुनम कोचर,अनिल वाणी, राजेद्र अमृतकार, सुहास देशमुख,किरण पाटील,चेतन राजपूत, अमोल पिगंळे,विकास ब्राम्हणकार, उज्वल मार्कडेय सर जितेंद्र लाड ,राजेद्र कोठावदे ,प्रमोद पिगंळे सर ,चद्रंकांत सोनजे सर ,जितेंद्र राणे ,सुनिल वाणी, पिटु शिरोडे, वनीता महींद ,योगेश येवले,योगराज संदानशिव,पंकज चौधरी,दीपक चौगुले,अबु महाजन,भाऊसाहेब महाजन ,गणेश चौधरी ,विजय चौधरी,विशाल चव्हाण,महेश शिरोडे ,महेश सोनजे , यासह असंख्य मान्यवर उपस्थित होते.


