खताचा केक कापुन झाडाचा वाढदिवस साजरा – ग्रीन फाऊंडेशन
![]()






खताचा केक कापुन झाडाचा वाढदिवस साजरा – ग्रीन फाऊंडेशन
लोणी काळभोर- तिर्थक्षेत्र रामदा महादेव मंदिर डोंगर परिसर येथे गेल्या वर्षी पंधरा हजार वृक्षांचे रोपण करण्यात आले होते.येथील झाडांचा वाढदिवस नैसर्गिकरित्या बनविलेल्या गांडूळखत, शेनखत ,माती या पासून बनविलेला केक त्यावर आकर्षक फुलांची, फुग्याची सजावट करण्यात आली होती केक उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कापून प्रत्येक झाडांना केक देण्यात आला . मुरलीधर गुजर, राहुल भाऊ भुतडा. लक्ष्मी एंटरप्रायजेस यांच्या वतीने झाडांच्या वाढदिवसानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. उन्हाचा तडका जास्त असल्याने तेथील परिसरात मंडपाची व्यवस्था युवराज काळभोर यानी किली होती. झाडाच्या वाढदिवसानिमित्त शिवकालीन युद्ध कलाचे आयोजन सुरज उकिरडे सर यांनी केले होते.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते दिन ५ जुन २०२३ ११००० वृक्षांचे रोपण,मोफत आयुर्वेदिक वृक्षवाटप, पाणी आढावा पाणी जिरवा, पक्षांना धान्य उपक्रम, पाणवठे उद्घाटन, वृक्ष संवर्धन जनजागृतीपर मार्गदर्शन, आरोग्य शिबीर, पर्यावरण पुरस्कार, महाप्रसाद, स्वच्छता मोहीम अशा प्रकारचे उपक्रम राबविण्यात आले
या वेळी हिन्दुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड, रामाकृषी रासायनिक कंपनी,पी.डी.आर.सी कंपनी,बालाजी रोडलाईन यांच्या वतीने झाडे देण्यात आले होते. या वेळी हिन्दुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड चे रमेश बी.यादव- उपमहाप्रबंधक, अखील पांडे- महाप्रबंधक, श्रीकंत माधवराव- महाप्रबंधक, प्रतिक फुलारी- प्रबंधक, संदिप दलाल- मुख्यप्रबंधक ,आनंद प्रकाश – उपमहाप्रबंधक, रामाकृषी रासायनिक कंपनी चे व्हि.पांडे – जनरल मॅनेजर ,आर.एन शर्मा- एचाआर मॅनेजर ,सुनील कुंजीर- प्रोडक्शन मॅनेजर ,पंचायत समिती मा.उपसभापती सनीशेठ काळभोर, वनविभागाचे बळीराम वायकर साहेब, अंकुश कचरे साहेब, नंदकिशोर काका काळभोर, प्रविन नाना काळभोर, तुळशीराम घुसाळकर, अमित भाऊ काळभोर, युवराज शेठ काळभोर मुरलीधर गुजर, नागेशसर काळभोर, प्रतिक कोळपे, शिंदे सर ,हुमे सर तसेच ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य, एकात्मिक बालविकास आशा वर्कर उरूळी बिट, जनाई शिक्षण संस्था,गिरीश विभा ट्रस्ट, वनविभाग लोणी काळभोर, वन व्यवस्थापन समिती, श्रीक्षेत्र रामदरा शिवालय देवस्थान ट्रस्ट,राॅयल स्पोर्ट्स ॲकेडमी,लोणी काळभोर कदम वाकवस्ती ग्रामस्थ उपस्थित होते .

