वृद्धांनी कलासाधना व छंदोपासना केल्यास मानसिक आरोग्य सुधारून वेळेचा सदुपयोगही होतो
[ चैतन्य नगर ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यक्रमात चित्रकार लिलाधर कोल्हे यांचे
मार्मिक प्रतिपादन ]
![]()

वृद्धांनी कलासाधना व छंदोपासना केल्यास मानसिक आरोग्य सुधारून वेळेचा सदुपयोगही होतो
[ चैतन्य नगर ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यक्रमात चित्रकार लिलाधर कोल्हे यांचे
मार्मिक प्रतिपादन ]
” वृद्धांनी कलासाधना व छंदोपासना केल्यास मानसिक आरोग्य सुधारून वेळेचा सदुपयोग होतो ” असे प्रतिपादन राज्य पुरस्कारप्राप्त सुप्रसिद्ध चित्रकार तथा लेखक लिलाधर कोल्हे यांनी केले.चैतन्यनगर ज्येष्ठ नागरिक संघ जळगाव येथील प्रांगणात ३१ मे २०२३ रोजी मे महिन्यात जन्मलेल्या महिला पुरुष सभासदांच्या वाढदिवसानिमित्त सालाबादाप्रमाणे शाल व पुष्प देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष ॲड.अरुण धांडे असून प्रमुख अतिथी ज्येष्ठ मार्गदर्शक फेस्काॅम मुंबईचे माजी अध्यक्ष डी.टी.चौधरी,माजी अध्यक्ष पंडितराव सोनार,डाॅ.के.के.भोळे,महिला संघाच्या अध्यक्षा भारती पाटील,उपाध्यक्ष साहेबराव पाटील मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते.प्रारंभी ॲड.अरूण धांडे यांनी प्रमुख अतिथिंचा शाल,गुलाब पुष्प देवून सत्कार केला आणि प्रास्ताविकात ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्य व प्रगतीची माहिती देऊन प्रमुख अतिथींचा परिचय धांडे यांनी करून दिला.चित्रकार कोल्हे यांच्या चित्रप्रदर्शनाची विजय लुल्हे यांनी केलेली मागणी धांडे यांनी चित्रकारांकडून जाहीरपणे मान्य करून घेतली.पुढील मार्गदर्शनात कोल्हे म्हणाले की,” अजिंठा लेण्यातील चित्रशैली व तत्कालीन सौंदर्य परंपरा आताच्या तंत्रज्ञानापेक्षा ॲडव्हान्स व सुसंस्कृत होती.स्पॅरो फाऊंडेशच्या ‘ चिमणी वाचवा ‘ अभियानाची त्यांनी साद्यंत माहिती दिली.निवृत्तीनंतर करीत असलेल्या कला साधनेची यशोगाथा , प्राप्त मानसन्मान आणि पुरस्कारांचा तपशील देत रामायण चित्र पुस्तिकेतील स्वतः रेखांकित चित्रांची माहिती दिली.कोल्हे यांनी संघास अजिंठा लेणीची चित्रपुस्तिका भेट दिली.श्रीमती अंजली चौधरी यांनी वाढदिवसासाठी सुरतालात कृतीगीत सादर केले त्यावेळी उपस्थितांनी उत्स्फूर्त टाळ्यांचा ठेका धरून आनंद लुटला.
सत्यशोधकी विजय लुल्हे यांचे ग्रंथदान
निवृत्त शिक्षक विजय लुल्हे यांनी महात्मा जोतिराव फुले स्थापित सत्यशोधक समाज संघाला दीडशे वर्ष पूर्ण झाल्याच्या औचित्याने वाढदिवसाच्या
सत्कारानिमित्त महात्मा फुले लिखित ‘ ब्राह्मणांचे कसब ‘, ‘ शेतकऱ्यांचा आसूड ‘ व ‘ तृतीय रत्न ‘ यांसह ११ पुस्तकांचा सेट ज्येष्ठ नागरिक संघाच्या वाचनालयासाठी संघाचे माजी अध्यक्ष पंडितराव सोनार यांना सादर भेट दिला.तसेच यावर्षी संघाच्या सभासदांसाठी पूज्य पिताश्री स्व.सुपडू सुतार ( निवृत्त ग्रेडेड मुख्याध्यापक ) यांच्या स्मृति प्रित्यर्थ स्वखर्चाने वैचारिक व साहित्यिक असे दोन कार्यक्रम देण्याची विनम्रतापूर्वक जाहिर घोषणा केली.
कार्यक्रमात सुमारे २५ ज्येष्ठ महिला – पुरुष सभासदांचा वाढदिवसानिमित्ताने सत्कार झाला.सत्कारार्थी निवृत शिक्षिका अंजली चौधरी व एन.बी.पाटील यांनी यांनी मनोगत व्यक्त केले.सूत्रसंचालन प्रकाश यावलकर यांनी केले.आभार प्रदर्शन माजी अध्यक्ष पंडितराव सोनार यांनी केले.सामुहिक पसायदानाने सभेची सांगता झाली.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सचिव विकास बोरोले,संचालक निवृत्त प्रा.रामदास मोते,महिला संचालक डॉ.विजया तळेले,आशा तळेले यांनी अमूल्य सहकार्य केले.

