रक्षिताचे दहावीच्या परीक्षेत यश..
![]()

अमळनेर-, येथील शिरूडनाका परिसरातील हनुमान नगर मधील रहिवाशी व सध्या नालासोपारा येथे वास्तव्यात असलेले व, अमळनेर एसटी डेपो मध्ये चालक म्हणून सेवेत असलेले श्री ज्ञानेश्वर भिका शेटे यांची कन्या रक्षिता ज्ञानेश्वर शेटे ही मार्च 23 च्या एसएससी परीक्षेत 90% गुणांनी विद्यालयात दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे सदर विद्यार्थिनी ही अत्यंत हुशार असून तिने टीव्ही मालिकेत , फुलाला सुगंध मातीचा, फुलपाखरू व अहिल्याबाई होळकर या मालिकेत विविध भूमिका तिने केले आहेत. त्याचप्रमाणे जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धेत विशेष प्राविण्य मिळवले आहे याबद्दल हनुमान नगर मधील रहिवाशांकडून रक्षिताचे व परिवाराचे अभिनंदन होत आहे.

