शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक शिरीष भामरे यांच्या सेवानिवृत्ती सत्कार
![]()

शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक शिरीष भामरे यांच्या सेवानिवृत्ती सत्कार
शिंदखेडा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष व प्रामाणिक पोलीस निरीक्षक शिरीष भामरे यांच्या सेवानिवृत्त झाल्याबद्दल पोलीस स्टेशनच्या आवारात शिदखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील भाबड पीएसआय मिलिंद पवार सेवानिवृत्ती पीएसआय केदार नाना यांच्या उपस्थितीत सेवानिवृत्ती
सत्काराचे कार्यक्रमाचे पोलीस स्टेशनच्या आवारात आयोजन करण्यात आले होते
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक सुनील भाबड यांनी शिरीष भामरे यांच्या सह पत्नी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात भामरे यांनी पोलीस नाईक भामरे एक प्रामाणिक शिस्त वेळ काम करण्याची उत्कृष्ट पद्धत यांच्यामुळे पोलीस स्टेशन मधील पोलीस नाईक म्हणून त्यांच्याकडे बघितले जात होते
म्हणून ते परिचित होते त्यांनी आपल्या सेवा काळात उत्कृष्ट अशी कामगिरी करून आपली ओळख निर्माण केली होती आर्मीत 19 वर्षे सेवेतून निवृत्त झाल्यावर त्यांनी पोलीस खात्यात आपली सेवा अठरा वर्षे सेवा करून एक प्रामाणिक पोलीस व त्यांची कर्तव्य एक शिस्तबद्ध कसे पार पाडले हे त्यांच्याकडून शिकावे त्यांनी यापुढे समाजाची परिवाराची तसेच राष्ट्राची सेवा करण्यात हातभार लावावा व आपल्या परिवारास वेळ द्यावा
यावेळी सेवानिवृत्त पोलीस नाईक शिरीष भामरे यांनी आपल्या मनोगत या
पुढील आयुष्य नवतरुणांना स्पर्धा परीक्षेचे ज्ञान तसेच गरजु विद्यार्थ्यांना पुस्तके व त्यांच्यासाठी काही मदत लागली तर मी सोडवण्यासाठी नेहमी प्रयत्न करीन गावातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना पोलीस भरती व आर्मी भरतीत जाण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी प्रयत्न करेन
सेवानिवृत्त पोलीस शिरीष भामरे वाघाडी,,,,,
यावेळी रफिक मुल्ला गोपाल माळी ललित काळे हर्षल चौधरी मांडगे दादा पठाण सूर्यवंशी हेमंत जाधव गोपनीय विभागाचे रमेश माळी तसेच पोलीस कर्मचारी व पोलीस पाटील संघटनेचे पदाधिकारी डॉक्टर महेंद्र पोलीस पाटील भडणे पाटील युवराज माळी व पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार व सूत्रसंचालन पोलीस पाटील गणेश गिरासे यांनी केले

