आपल्या पाल्याचा प्रवेश घेते वेळी
शाळेच्या मान्यतेच्या कागद पत्रांची पाहणी करा- गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील
![]()

आपल्या पाल्याचा प्रवेश घेते वेळी
शाळेच्या मान्यतेच्या कागद पत्रांची पाहणी करा
गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर तालुक्यातील जनतेस आवाहन करण्यात येते की, नवीन
शैक्षणिक सत्र 2023-24 सुरु होत आहे. राज्यासह जिल्ह्यात अनधिकृत शाळाचा मुद्दा ऐरणीवर
आला आहे. अनधिकृत शाळा या शिक्षण विभागाची परवानगी न घेता तसेच कोणत्याही नियम
व अटींची पूर्तता न करताच शाळा सुरु करून विद्यार्थ्यांना प्रवेश देतात. किवा राज्य मंडळाची
परवानगी असताना इतर शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम शिकवतात. अशा अनधिकृत शाळावर
आरटीई 2009 मधील कलम 18 (5) च्या तरतुदिनुसार फोजदारी स्वरुपाची करवाई करण्यात
येते.म्हणून पालकांना आवाहन करण्यात येते की, आपण आपल्या पाल्याचा प्रवेश घेते वेळी
शाळेच्या मान्यतेच्या कागद पत्रांची पाहणी करावी त्यात शाळेची मान्यता, शाळेचा यु डायस
नंबर, ऍफ़िलेशन नंबर तसेच शाळेचा व्यवस्थापन प्रकार बघूनच आपल्या पाल्याचा प्रवेश
निश्चित करावा.अनधिकृत शाळांच्या खोट्या आमिषांना बळी पडू नये गटशिक्षणाधिकारी विश्वास हरी पाटील
पंचायत समिती अमळनेर यांनी एका पत्रकाद्वारे आवाहन केले आहे..

