शंतनू अजय दाणेज याचा
स.ध.भावसार यांनी केला गौरव !
![]()

पारोळा – येथील न्हावी गल्लीतील रहिवासी चि. शंतनू अजय दाणेज याने आपल्या कुटुंबाच्या परिस्थितीची जाणीव ठेवून कोणत्याही प्रकारची शिकवणी व इतर मार्गदर्शन न घेता केवळ शाळेतील शिक्षकांचे अध्यापन व अपार मेहनतीने फेब्रुवारी/ मार्च २०२३ मध्ये झालेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र विज्ञान शाखा परीक्षेत ८३.३३ टक्के गुण मिळवून नेत्रदीपक यश संपादन केल्याचा आनंद वाटल्याने गुणग्राहक व्यक्तिमत्व राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श निवृत्त शिक्षक सदानंद धडू भावसार यांनी त्याचे निवासस्थानी जाऊन अभिनंदन पत्र, गौरव पत्र रोख बक्षीस देऊन त्याला सन्मानित केले.याबद्दल चि.शंतनू व त्याच्या कुटुंबीयांनी भावसार सरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करुन आभार मानले.
शंतनू हा येथील उमेश करोडपती उच्च माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी असून इयत्ता १० वीत देखील १०० टक्के गुण मिळवून उत्तुंग यश संपादन केले होते.

