1 min read

राष्ट्रीय ज्युनियर काँलेज चाळीसगांवने यंदा ही राखली उज्वल यशाची परंपरा.

Loading

राष्ट्रीय ज्युनियर काँलेज ने यंदा ही राखली उज्वल यशाची परंपरा.

विज्ञान शाखेत 716 विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी 693 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.शेकडा निकाल 96.78 लागला. वाणीज्य शाखेत 214 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्या पैकी 207 विद्यार्थी उत्तीर्ण झाले शेकडा निकाल 96.72 लागला. कला शाखेत 446 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्या पैकी 365 विद्यार्थी उत्तीर्ण झाले शेकडा निकाल 81.83 लागला. किमान कौशल्य विभागाचा निकाल 93.61 लागला.

कॉलेज मधून प्रथम दायमा निधी कैलास (वाणिज्य शाखा) हिला 93.17 % मिळाले.

कला शाखेतून पाटील तनिष्का मनोज ही विद्यार्थ्यांनी प्रथम आली असून तिला 86.33 % मिळाले आहे.

विज्ञान शाखे मधून प्रथम पवार सान्वी सचिन या विद्यार्थ्यांनीस 80.83% मिळाले.

निकालात डिस्टिंक्शन मधून कॉलेजचे 40 विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे, प्रथम श्रेणीतून 245 उत्तीर्ण झालेत.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे त्यांच्या पालकांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष डॉ. बापूसाहेब विनायक चव्हाण. सचिव प्राचार्य आबासो. बाळासाहेब चव्हाण. संस्थेच्या उपअध्यक्ष पुष्पाताई भोसले सहसचिव रावसाहेब सांळुखे. तसेच सर्व संचालक मंडळाने व राष्ट्रीय ज्युनियर कॉलेज चे प्राचार्य सी. बी. पवार, उपप्राचार्य एस. डी. पाटील यांनी अभिनंदन केले. 🌹

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *