1 min read

दलित पँथर च्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त पुन्हा दलित पँथर सुरू करा 

Loading

दलित पँथर च्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त पुन्हा दलित पँथर सुरू करा 

अमेरिकेतील आंबेडकरी अनुयायांची केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांना सूचना

मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे)   दलित पँथरचे सुवर्ण महोत्सवी वर्ष महाराष्ट्रात साजरे होत आहे. या सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त भारतात पुन्हा दलित पँथर सुरू करावी. आक्रमक संघर्षशील  दलित पँथर संघटनेची गरज असून पुन्हा भारतात दलित पँथर सुरू करण्यासाठी पँथर रामदास आठवले यांनीच  पुढाकार घ्यावा अशी सूचना अमेरीकेतील आंबेडकरी अनुयायांनी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांना केली. ना.रामदास आठवले हे अमेरिका दौऱ्यावर असताना न्यूजर्सी मधील आंबेडकरी अनुयायांच्या बैठकीतआंबेडकरी अनुयायांशी ना.रामदास आठवले यांनी संवाद साधला.

 त्यावेळी अमेरिकेतील आंबेडकरी अनुयायांनी भारतात पुन्हा दलित पँथर ची गरज असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी मिलिंद अवसरमल; सौ.नंदिता अवसरमल; तसेच अमेरिकेत युनो च्या मुख्यालयात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करणारे दिलीप मस्के आदींनी ना.रामदास आठवले यांचे स्वागत केले. दलित पँथर च्या सुवर्ण महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच राज्यभर सर्व विभागांत जिल्ह्यांत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले) तर्फे दलित पँथरचे  सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे केले जात असल्याबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या. 

दलित पँथर नंतर आपण भारतीय दलित पँथर सुरू केली. त्या धर्तीवर आता पुन्हा दलित पँथर च्या सुवर्ण महोत्सवी वर्षात दलित पँथर हे लढाऊ तरुणांचे संघटन पुन्हा उभारण्याबाबत निश्चित विचार करून निर्णय घेऊ असे ना.रामदास आठवले यांनी अमेरिकेतील आंबेडकरी अनुयायांना आश्वासन दिले.

न्यूजर्सी येथील थाई बुद्ध विहारात बुद्ध जयंती च्या कार्यक्रमात ना.रामदास आठवले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले. यावेळी ना.रामदास आठवले यांच्या पत्नी सौ सीमाताई आठवले; कुमार जित आठवले उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *