26 मे ला शुक्रवारी अमळनेरलाविद्रोही साहित्य संमेलन पदाधिकाऱ्यांची बैठक
![]()

विद्रोही साहित्य संमेलन आयोजन समितीची बैठक
अमळनेर शहरात होणाऱ्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या आयोजना संबंधीची एक महत्वपूर्ण बैठक दिनांक 26 मे 2023 वार शुक्रवार रोजी forts, (नगरसेवक श्याम पाटील यांचे कार्यालय) ढेकु रोड, अमळनेर. येथे आयोजित करण्यात आलेली आहे . या बैठकीस विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे संघटक किशोरजी ढमाले, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष अविनाश पाटील यासह प्रमुख मान्यवर उपस्थित असणार आहेत.
विद्रोही साहित्य संमेलन अमळनेरला घेण्याच्या दृष्टीने आयोजन व नियोजनाचे स्वरूप समजून घेणे,
पुढील एका महिन्यासाठी कृती आराखडा तयार करणे,
स्थानिक पातळीवर विविध समित्यांचे गठन करणे यासारख्या विविध विषयांवर या बैठकीत विचार विनिमय व निर्णय होणार असून आपण या बैठकीसाठी अवश्य उपस्थित रहावे ही विनंती.
स्थळ: FORTS, ढेकू रोड, अमळनेर
दिनांक : 26 मे 2023
वेळ: सायंकाळी 05 वाजता
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

