कै.राजाभाऊ काळभोर यांच्या व्दितीय पुण्यस्मरण निमित्त वृक्षारोपण
![]()


कै.राजाभाऊ काळभोर यांच्या व्दितीय पुण्यस्मरण निमित्त वृक्षारोपण
लोणी काळभोर- मुठीत मावल्या नाही उधळून गेल्यात स्मृती इंद्रधनुष्याचे सारे रंग दाखवून गेल्या स्मृती जाणीव नेणिवेच्या पलीकडे भेटवून गेल्या स्मृती तोल ढळता ढळता सावरून गेल्या स्मृती समोर सावलीशी दिसली बावरून गेल्या स्मृती तमाची छाया घनदाट उजळून गेल्या स्मृती वियोगाचा वणवा उरी पेटवून गेल्या स्मृती ती शेज शरांची होती जगवून गेल्या स्मृती कोमजले होते आत काही, उमलून गेल्या स्मृती
साथ कधीही सोडणार नाही सांगून गेल्या स्मृती कै.राजाभाऊ काळभोर यांच्या पुण्यस्मरण निमित्त लोणी काळभोर तीर्थक्षेत्र रामदरा महादेव मंदिर डोंगर परिसरात वनव्यवस्थापन समिती , ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य च्या माध्यमातून वड,करंज, खैर, उंबर, कडुनिंब अशी १०१ वृक्ष लागवड करत श्रद्धांजली वाहण्यात आली. या वेळी ग्रीन फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष अमित जगताप, ग्रीन फाऊंडेशन पुणे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय शेंडगे, ग्रीन फाउंडेशन हवेली तालुका संपर्क प्रमुख बाबासाहेब यादव, जिवन जाधव ,बिरूदेव भास्कर, अभिषेक शेंडगे, निरक बिका, उपस्थित होते .

