1 min read

सुनील नंदवाळकर यांची उपविभागीय पोलीस अधिकारी (DySP) म्हणून अमळनेर येथे पदोन्नती,डिवाएसपी राकेश जाधव यांची जालना येथे बदली

Loading

सुनील नंदवाळकर यांची उपविभागीय पोलीस अधिकारी (DySP) म्हणून अमळनेर येथे पदोन्नती – –

अमळनेर प्रतिनिधी
सुनील दिगंबर नंदवाळकर यांची उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून अमळनेर येथे पदोन्नती झाली.त्यांचे मूळ गाव फागणे आहे.
अत्यंत शांत, संयमी तसेच शिस्तप्रिय अशी ओळख असलेले सुनील नंदवाळकर यांनी अतिशय कठीण परिस्थितीत आपले उच्च शिक्षण पुणे येथून घेतले. पोलीस विभागात १९९० मध्ये खडतर असलेल्या नक्षलग्रस्त गडचिरोली येथून पोलीस उपनिरीक्षक म्हणून आपली सेवा प्रारंभ केली.त्यांनी आतापर्यंत पोलीस विभागात विविध गडचिरोली, जळगाव, चोपडा, औरंगाबाद, नाशिक, पालघर, नंदुरबार अशा विविध ठिकाणी आपल्या कर्तुत्वाची छाप पाडली आहे. तसेच त्यांनी राज्यात गाजलेल्या तेलगी तपासात महत्त्वाची भूमिका पार पाडली.
श्री. नंदवाळकर यांना घरातूनच अध्यात्मिक तसेच सामाजिक वारसा लाभलेला आहे.त्यांचे वडील स्वर्गीय दिगंबर नाना हे धुळे जिल्हा परिषद सदस्य होते. एकाच घरातील दोन भाऊ Dy. SP म्हणून कार्यरत असणे हि विशेष बाब आहे. लहान भाऊ अनिल बडगुजर हे धुळे येथे अँटीकरप्शन विभागात DySP म्हणून कार्यरत आहेत. मोठे बंधू राजेंद्र नंदवाळकर हे सेवानिवृत्त उपकार्यकारी अभियंता आहेत तसेच संजय बडगुजर हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत, लहान भाऊ श्यामभाऊ बडगुजर हे भाजपा तालुकाध्यक्ष म्हणून वडिलांचा राजकीय वारसा चालवत आहे. लहान बहीण सौ. शीतलताई संभाजी बडगुजर या देखील उच्च विद्याविभूषित आहे.
अमळनेरचे डी वाय एस पी राकेश जाधव यांची अमळनेरला अत्यंत उत्कृष्ट अशी कामगिरी पार पाडली त्यांनी अमळनेर तालुक्यात सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या अंतर्गत गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घातला त्यांची निरोपप्रसंगी सर्व स्तरातून शुभेच्छा देण्यात आल्या व नूतन उपविभागीय पोलीसअधिकारी सुनील नंदवाडकर यांचे स्वागत करण्यात आले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *