वर्ल्ड पार्लमेंट असोसिएशनने नवोदित कवी व साहित्यिकांना विचारपीठ उपलब्ध करून दिले
माजी पोलीस अधिकारी तथा जेष्ठ साहित्यिक
सुभाष सोनवणे
वर्ल्ड पार्लमेंटच्या वतीने आंतरराष्ट्रीय स्तरावरील काव्यलेखन स्पर्धतील विजेत्यांचा व इतर क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांचा झाला सन्मान..
![]()


वर्ल्ड पार्लमेंट असोसिएशनने नवोदित कवी व साहित्यिकांना विचारपीठ उपलब्ध करून दिले
माजी पोलीस अधिकारी तथा जेष्ठ साहित्यिक
सुभाष सोनवणे
वर्ल्ड पार्लमेंटच्या वतीने आंतरराष्ट्रीय स्तरावरील काव्यलेखन स्पर्धतील विजेत्यांचा व इतर क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांचा झाला सन्मान..
श्रीरामपूर प्रतिनिधी
वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशन अर्थात जागतिक संविधान व संसद संघ (डब्ल्यूसीपीए) यांच्या वतीने श्रीरामपूर येथील शासकीय व्हिआयपी गेस्ट हाऊस सभागृहात आतंरराष्ट्रीय स्तरावरील बाप या विषयावरील काव्य संमेलन घेण्यात आले. या प्रसंगी ज्येष्ठ साहित्यीक व माजी पोलिस अधिकारी सुभाष सोनवणे यांनी वर्ल्ड पार्लमेंटच्या साहित्य क्षेत्रातील अनेक सुत्य उपक्रमांचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते.
या प्रसंगी व्यासपिठावर उपस्थित असलेले प्रमुख अतिथी श्री. सुनिल पाटील (वरिष्ठ पत्रकार व धुळे जिल्हा पत्रकार संघ अध्यक्ष), श्री. रणजीत श्रीगोड (महाराष्ट्र प्रवेश प्रवासी महासंघ अध्यक्ष), श्री. निवृत्ती बागुल (संपादक -दै. बालेकिल्ला मालेगांव), श्री. दिपक म्हस्के ( सचिव, महाराष्ट्र सेना फिल्म संघ), सौ. जयश्री सोनवणे ( सामाजिक कार्यकर्त्या व पत्रकार), श्री. सिताराम नरके (राष्ट्रपती पोलिस पदक विजेते), श्री. जगदीप वनशिव (रानकवी व जेष्ठ कवी) व श्री. सुरेश कांबळे ( आला बाबूराव -या लोकप्रिय गिताचे गायक व गायक) यांनीही प्रबोधनात्मक व वर्ल्ड पार्लमेंटच्या कार्याचे कौतुक केले.
वर्ल्ड पार्लमेंटच्या महाराष्ट्र चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. दत्ता विघावे यांनी संस्थेच्या कार्याचा व भविष्यातील नियोजनाचा थोडक्यात आढावा आपल्या प्रास्ताविकात घेताना सर्वच उपस्थितांचे स्वागत केले. वर्ल्ड पार्लमेंटच्या वतीने नुकतीच एक आंतरराष्ट्रीय स्तरावरील काव्यलेखन स्पर्धा घेण्यात आली त्यातील पाच विजेते
श्री. रूपचंद शिदोरे, श्री. शुभम मोहिते, श्री. दर्शन जोशी, श्री.योगिराज कोचाडे, मेजर श्री. रामदास शेळके यांचा विशेष सन्मान करण्यात. त्याचबरोबर समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या श्रीमती. खुर्शादबी शेख, साहित्य व कृषी (सोलापूर), श्री.व्यंकटराव भोसले, मुतखडा तज्ञ (इंदापूर, पुणे), श्री. रूपचंद शिदोरे सर्वोत्कृष्ठ रेल्वे मोटरमन व साहित्य (अहमदनगर), श्री.अशोक पवार, साहित्य (कडेगांव, सांगली), श्री.वजीर शेख पत्रकारीता व सामाजिक कार्य (पाथर्डी), श्री. बाळासाहेब कोठुळे पाथर्डी, अहमदनगर), श्री. निवृत्ती बागुल, पत्रकारीता ( संपादक -दै. बालेकिल्ला मालेगांव). प्रा. डॉ. वंदना केंजळे, शिक्षण, साहित्य व योगा (पुणे), यांना वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवॉर्ड व मेंबरशीप देऊन सन्मानीत करण्यात आले. तर मनजितसिंग बत्रा, श्रीरामपूर यांना सदस्यत्व प्रदान करण्यात आले.
काव्यलेखन स्पर्धेतील विजेते कवी श्री. रूपचंद शिदोरे, श्री. शुभम मोहिते, श्री. दर्शन जोशी, श्री.योगिराज कोचाडे, मेजर श्री. रामदास शेळके यांच्याशिवाय राष्ट्रपती पदक विजेते कवी श्री. सिताराम नरके, श्री. आनंदा साळवे,श्री.भास्करराव लगड, संपादक श्री.निवृत्ती बागुल, श्री.आत्माराम शेवाळे, श्री.बाळासाहेब कोठुळे, श्री.बाळासाहेब ठोंबरे, श्री.सी के भोसले, श्री.अशोक पवार शिवणीकर, श्री. बाळासाहेब मुंतोडे, सौ. सुदर्शना संजय महाजन, सौ. आश्विनी योगेश पाटील, सौ.आश्विनी प्रसन्न धुमाळ, सौ.प्रियंका वायकोस, श्रीमंती मंगल गायकवाड, प्रा.डॉ. वंदना केंजळे, श्री. निखिल पोनफळे, राहुल जाधव, मुकुंद तांबे या नामवंत कवींनी आपल्या बाप या विषयावरील हृदयद्रावक कविता सादर करून उपस्थितांच्या आसवांना त्यांच्या नयनातून मुक्त करण्यास वाटा मोकळ्या केल्या.
सदर कार्यक्रमाचे उदघाटन भारतीय समाजात व आयुर्वेदात महत्वाचे स्थान असलेल्या तुळशीला जलार्पण व स्व. बाबुलालजी विघावे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. दत्ता विघावे यांचे पिताश्री स्व. बाबुलालजी विघावे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सदर काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
सुरुवातीला डब्ल्यूसीपीएच्या महाराष्ट्र चॅप्टरचे को-ऑर्डीनेटर मेजर अशोकराव मोहिते यांनी अध्यक्षीय सुचना मांडली तर खजिनदार श्री.सी.के भोसले यांनी अनुमोदन दिले.
या कार्यक्रमाचे खास वैशिष्टये म्हणजे सर्व पुरस्कार विजेते व कवींना एका विशेष सिंहासनावर बसवून मान्यवरांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले. सदर उपक्रमाचे जगभर थेट प्रक्षेपण करण्यात आले. श्री. अनंत द्रविड यांनी पुरस्कार समारंभाचे तर रानकवी जगदीप वनशिव यांनी काव्यसंमेलनाचे अत्यंत रसाळ व मधुर वाणीने निवेदन व सुत्रसंचलन केले. शेवटी डब्ल्यूसीपीएच्या महाराष्ट्र चॅप्टरचे सहसचिव श्री. ऋषिकेश विघावे यांनी सर्वांचे आभार मानले.




