1 min read

कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे कार्यक्षम आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सरांच्या समय सुचकतेमुळे अनुकंपा तत्वावर मिळाली तात्काळ मान्यता..

Loading

कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार मा. ज्ञानेश्वर म्हात्रे सरांचे आभार

नमस्कार 🙏
मी रिता भिलेसिंग ठाकूर . माझ्या वडिलांचे कोविड मध्ये जुलै 2020 ला निधन झाले . त्यांच्या जागी मला अनुकंपा तत्त्वाने सखाराम शेठ विद्यालय काटई कोळे कल्याण येथे कनिष्ठ लिपिक पदाकरिता माझा प्रस्ताव जिल्हा परिषद ठाणे येथे मागील दोन वर्षापासून प्रलंबित होता. सतत पाठपुरावा करून देखील मला मान्यता मिळत नव्हती ही बाब मी आमदार मा. म्हात्रे सरांच्या निदर्शनास आणून दिल्या नंतर साहेबांनी स्वतः या विषयात लक्ष घातले आणि त्याचा पाठपुरावा केला असता दोन दिवसात मला कनिष्ठ लिपिक पदाची मान्यता मिळाली त्यामुळे मा. आमदार म्हात्रे सरांचे व शिक्षणाधिकारी मा. ललिता दहितुले मॅडम, अधिक्षक मा. संजय राऊत साहेब, मुख्याध्यापिका ठाकूर मॅडम, चंद्रकांत ठाकूर सर आणि सरांच्या संपुर्ण टीम चे खूप खूप धन्यवाद आणि आभार मानते.
आज मी आमदार म्हात्रे सरांची भेट घेतली आणि म्हात्रे सरांचे आभार मानले व म्हात्रे सरांच्या हस्ते माझी वैयक्तीक मान्यतेचा आदेश स्वीकारला. आमदार म्हात्रे सरांचे अभिनंदन रिता ठाकूर यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *