शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांचा कल्याण येथे समाज बांधवांनी केला सत्कार
![]()



शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांचा कल्याण येथे समाज बांधवांनी केला सत्कार
कल्याण येथील मनसेचे महाराष्ट्र राज्य कामगार सेनेचे उपाध्यक्ष तसेच समाजभूषण, युवा समाजसेवक श्री राजेशभाऊ उज्जैनकर यांच्या रामबाग येथील कार्यालयामध्ये नुकतेच शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर चे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर व फाऊंडेशनचे ठाणे जिल्हा समन्वयक श्री रमेशभाऊ उज्जैनकर यांचा शाल ,श्रीफळ व टोपी घालून आणि गुलाब बुके देऊन सत्कार केला याप्रसंगी कल्याण शहराचे शिवसेना उपप्रमुख श्री सुरेशभाऊ सोनार उद्योगपती श्री योगेशभाऊ बुडूखले त्याचप्रमाणे प्रहार वृत्तपत्राचे विभागीय वरिष्ठ अधिकारी श्री किशोरभाऊ उज्जैनकर यांनी सुद्धा त्यांच्या निवासस्थानी डॉ. शिवचरण उज्जैनकर व श्री रमेशभाऊ उज्जैनकर यांचा सत्कार केला. या प्रसंगी डॉ.शिवचरण उज्जैनकर यांनी स्व. संपादित प्रबोधनाची ज्ञान दिंडी हे पुस्तक मान्यवरांना भेट दिलीत. याप्रसंगी समाज बांधवांनी डॉ. शिवचरण उज्जैनकर यांच्या कार्याचे मनापासून कौतुक केले.

