काल्हेर गावचे सुपुत्र द्वारकानाथ म्हात्रे यांना दैनिक नवराष्ट्र – नवभारत यांच्यावतीने आदर्श कबड्डी खेळाडू पुरस्कार प्रदान!
![]()

काल्हेर गावचे सुपुत्र द्वारकानाथ म्हात्रे यांना दैनिक नवराष्ट्र – नवभारत यांच्यावतीने आदर्श कबड्डी खेळाडू पुरस्कार प्रदान!
मुंबई,ठाणे, (मनिलाल शिंपी) दैनिक नवमहाराष्ट्र व दैनिक नवभारत यांच्या संयुक्त विद्यमाने दैनिक महाराष्ट्र ठाणे सन्मान सोहळा शनिवार दिनांक २०/५/२०२३ रोजी प्रल्हाद केशव अत्रे रंगमंदिर बाजारपेठ रोड भोईवाडा कल्याण येथे मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला, यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांचा विविध पुरस्काराने सन्मान करण्यात आला यावेळी काल्हेर गावचे सुपुत्र व राष्ट्रीय कबड्डीपटू श्री. द्वारकानाथ म्हात्रे यांना दैनिक नवराष्ट्र – नवभारत यांच्यावतीने आदर्श कबड्डी खेळाडू पुरस्कार मंत्री मा.ना
श्री. रवींद्र चव्हाण व आमदार विश्वनाथ भोईर यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
कारण त्यांच्या सन्मानार्थ महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने द्वारकानाथ म्हात्रे राष्ट्रीय कबड्डीपट्टू
(ज्येष्ठ खेळाडू पुरस्काराने सन्मानित ) भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा२०२२- २३ चे आयोजन साई सेवक प्रतिष्ठान सामाजिक व शैक्षणिक संस्था भिवंडी यांच्या माध्यमातून सर्व समाजाला सोबत घेऊन चालणाऱ्या आगरी महोत्सव २०२२- २३ चे संस्थापक अध्यक्ष श्री.विशु(भाऊ)म्हात्रे यांनी राज्यस्तरीय कबड्डीचा महासंग्राम दि.२६ ते ३० जानेवारी २०२३ दरम्यान आयोजित केला होता.
कबड्डी स्पर्धा म्हटलं की मातीतला खेळ असे म्हटले जाते त्यामुळे खेळ रांगड्या मातीतला या नावाने या स्पर्धेचे आयोजन भिवंडी आगरी महोत्सव २०२२- २३ साईधाम विश्रांती ग्रह सत्यम पेट्रोल पंपाच्या बाजूला नाशिक हायवे लगत सोनाळे गाव तालुका भिवंडी जिल्हा ठाणे या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती, सदर स्पर्धा ही सन्मान मातीतल्या खेळाडूंचा
आहे असं म्हणायला वावगं ठरू नये, हा संपूर्ण आगरी महोत्सव हा साई सेवक प्रतिष्ठान सामाजिक व शैक्षणिक संस्था भिवंडी संस्थापक अध्यक्ष विशुभाऊ म्हात्रे व त्यांच्या सर्व टीमने आयोजित केला होता, त्यातच त्यांचा हा पुन्हा मोठा सन्मान झाल्यामुळे त्यांच्यावर संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील अभिनंदनचा वर्षाव होत आहे त्याचप्रमाणे दैनिक स्वराज्य तोरण परिवाराकडून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व त्यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

