1 min read

वरीष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण तात्काळ सुरू करा. जुक्टो संघटनेची आग्रही मागणी.

Loading

वरीष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण तात्काळ सुरू करा. जुक्टो संघटनेची आग्रही मागणी.

जळगाव: राज्यातील एकाच वेतनश्रेणीत सलग १२ व २४ वर्षे सेवा पूर्ण झालेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांसाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे अर्थात एस.सी.ई.आर.टी.द्वारा उन्हाळी सुट्टीमध्ये दहा दिवसांचे सेवांतर्गत प्रशिक्षण आयोजित केले जात असते. मात्र यंदा मे महिन्याचे १७ दिवस उलटून गेल्यावरही सलग सेवेची वरील अट पूर्ण करणाऱ्या शिक्षकांसाठी सेवांतर्गत प्रशिक्षण वर्गाच्या आयोजनासाठी नावनोंदणी प्रक्रिया अद्याप पावेतो सुरू झालेली नाही. गेल्या वर्षी सदर प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने सशुल्क स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आलेले होते. सदर प्रशिक्षणाचा मुख्य हेतू असा की, शिक्षण पद्धतीमध्ये दिवसागणिक होत असलेल्या नवनवीन संकल्पनांचे, बदलांचे ज्ञान शिक्षकांना अवगत व्हावे, काळानुरूप वेगवेगळ्या शैक्षणिक अध्ययन-अध्यापन पद्धती ज्ञात व्हाव्यात यासाठी तज्ञ मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनात सदर प्रशिक्षण वर्गाचे आयोजन प्रामुख्याने उन्हाळी सुट्टीमध्ये केले जाते. बरेचदा सदर प्रशिक्षण दिवाळी सुट्टीमध्ये सुद्धा आयोजित केले जात असते. मात्र यंदा अद्यापपावतो सदर प्रशिक्षणासाठी कुठल्याही प्रकारची नावनोंदणी प्रक्रिया सुरू न झाल्याने शिक्षक वर्ग सदर प्रशिक्षण यंदा होईल की नाही अशा संभ्रमावस्थेमध्ये सापडलेला आहे. तरी सदर प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करून नवीन शैक्षणिक वर्ष उजाडण्याच्या आत सदर प्रशिक्षण पात्र शिक्षक बंधू -भगिनींना उपलब्ध करून द्यावे अशी आग्रही मागणी जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रा. नंदन वळींकार, सचिव प्रा.सुनील सोनार, सहसाचिव प्रा.डी.जे. चिकटे, उपाध्यक्ष प्रा.डॉ. अतुल इंगळे, प्रा.गजानन वंजारी, ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा.डी.डी.पाटील, प्रा.सुनील गरुड कार्याध्यक्ष प्रा.शैलेश राणे, प्रा.सुनील पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकांद्वारे केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *