1 min read

जूलै महिन्यात वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीचे ऑनलाइन प्रशिक्षण होणार

Loading

जूलै महिन्यात वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीचे ऑनलाइन प्रशिक्षण होणार

शिक्षक भारती संघटनेचा यशस्वी पाठपुरावा

वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणीच्या प्रशिक्षणाचे आयोजन करावे अशी मागणी शिक्षक भारती संघटनेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे यांच्याकडे केली होती. सदर मागणी मंजूर झाल्याने मागील वर्षभरामध्ये 12 वर्षे व 24 वर्ष सलग सेवेत पूर्ण झालेल्या शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीचे लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

कोरोना कालावधीत सुमारे एक लाख शिक्षकांचे स्प्रिंगबोर्ड ॲपच्या माध्यमातून ऑनलाइन प्रशिक्षण घेण्यात आले होते. त्यानंतर 12 वर्षे व 24 वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांचे प्रशिक्षण न झाल्याने त्यांना वरिष्ठ व निवड वेतन श्रेणीचे लाभ मिळत नव्हते. याबाबत शिक्षक भारतीने ऑनलाइन प्रशिक्षण आयोजन करण्याची मागणी केली होती. ही मागणी मंजूर झाल्याने जूलै महिन्यात ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण होणार आहे. पात्र शिक्षकांनी लवकरच देण्यात येणाऱ्या लिंकवर जाऊन नोंदणी पूर्ण करायची आहे. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर जुलै महिन्यात प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. शिक्षण विभागाकडून याबाबतची लिंक व परिपत्रक जाहीर केल्यानंतर आपल्याला पुढील माहिती देण्यात येणार आहे. धन्यवाद

आपला स्नेहांकित
सुभाष किसन मोरे
कार्याध्यक्ष
शिक्षक भारती महाराष्ट्र

मा.नारायण वाघ जिल्हाध्यक्ष जळगांव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *