प्रणित चौधरी दहावीच्या सीबीएस बोर्डामध्ये 97 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण
सर्वत्र अभिनंदन
![]()

प्रणित चौधरी दहावीच्या सीबीएस बोर्डामध्ये 97 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण
सर्वत्र अभिनंदन
अमळनेर प्रतिनिधी
कळमसरे येथील युवा अभियंता प्रमोद रमेश चौधरी यांचे चिरंजीव प्रणित उर्फ स्वामी याला दहावीच्या सीबीएस बोर्डामध्ये 97 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाला .
सविस्तर माहिती अशी कीप्रणित प्रमोद चौधरी हा मुंबई कांदिवली येथील Ryan international school मध्ये CBSE बोर्ड ला ९७% गुण मिळवून शाळेत दुसरा आला असून तो ९८ मार्क्स मिळवून मराठी विषयात शाळेत पहिला आला आहे.
त्याला मार्गदर्शन शाळेचे प्राचार्य ,शिक्षक वृंद यांचे लाभले,मा.कळमसरे ता.अमळनेर येथील ग्रामपंचायत सदस्य आबासौ रमेश चिंधा चौधरी व नानासौ गणेश चिंधा चौधरी यांचा नातू आहे.तर कळमसरे येथील अभियंता प्रमोद चौधरी यांचा मूलगा आहे. त्याच्या यशाचे अभिनंदन कळमसरे येथील सर्व मित्र परिवार व समाज बांधवांनी केले.
(प्रणीतच्या यशाबद्दल मराठी लाईव्ह न्युजच्या वतीने मनापासून अभिनंदन!💐)

