1 min read

देवगाव- देवळी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कल्पनाबाई पाटील

Loading

देवगाव- देवळी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कल्पनाबाई पाटील

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) : देवगाव- देवळी येथील ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ कल्पनाबाई चंद्रभान पाटील यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
देवगाव- देवळी येथील ग्रामपंचायतीत गेल्या काही दिवसांपासून सरपंच पद हे रिक्त होते. यासाठी 11 मे 2023 रोजी निवडणुक घेण्यात आली. सरपंच पदासाठी सौ. कल्पनाबाई चंद्रभान पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने अध्यासी अधिकारी पी. एस. पाटील यांनी सौ. कल्पनाबाई चंद्रभान पाटील यांची सरपंचपदी बिनविरोध निवड घोषीत केली. निवडणुकीकामी तलाठी प्रथमेश पिंगळे, ग्रामसेवक कमलेश निकम, सुभाष भोई, कोतवाल गोकुळ बैसाणे यांनी सहकार्य केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुभाष बैसाणे, सरलाबाई पाटील, आनन भिल, मंदा पाटील, वैशाली पाटील, अनिता मोरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित सरपंचांचा ग्रामस्थांतर्फे सत्कार करण्यात आला.

चौकट
नूतन सरपंच कल्पनाबाई पाटील म्हणाल्या की माझी सरपंचपदी निवड झाल्याने मनस्वी आनंद आहे.. माझ्या कार्यकाळात देवगांव देवळी गावाच्या विकासासाठी मी सदैव कटिबद्ध राहील..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *