2005 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांचा जुनी पेन्शनचा प्रश्न त्वरित मार्गी लावा
आझाद मैदानावरील जुनी पेन्शन आंदोलनास आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची भेट
न्याय मागणीला उशीर का?आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा सवाल..
![]()

2005 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांचा जुनी पेन्शनचा प्रश्न त्वरित मार्गी लावा
आझाद मैदानावरील जुनी पेन्शन आंदोलनास आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची भेट
न्याय मागणीला उशीर का?आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा सवाल..
मुंबई,ठाणे( मनिलाल शिंपी):1 नोव्हेंबर ही 2005 पूर्वी नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन मिळावी म्हणून 8 दिवसापासून आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाला कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी पुन्हा भेट दिली आंदोलन कर्त्या शिक्षकांसोबत दुपारच्या जेवणाची चटणी भाकरी सुद्धा खाल्ली.
यासंदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांशी सातत्याने चर्चा केली असून, लवकरच बैठक लागावी म्हणून मुख्यमंत्री कार्यालयातील कक्ष अधिकारी श्री नितीन दळवी साहेब यांचीही भेट घेऊन सोमवार पर्यंत बैठक लावावी अशी विनंती केली आहे, तसेच 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन बाबत सुकाणू समितीचा आढावा घेतला, सर्वांना जुनी पेन्शन लागू व्हावी याकरता आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे प्रयत्न करत आहेत.
आंदोलना प्रसंगी समन्वय समितीचे सर्व कार्यकर्ते आंदोलनाचे नेतृत्व करणारे माजी आमदार दत्तात्रय सावंत व देशपांडे, समन्वय संघाचे नलावडे सर, प्रसाद गायकवाड , वाले सर उपस्थित होते.
तसेच आजाद मैदानावर चालू असलेल्या 78 डिग्री कॉलेजला 100% टक्के अनुदान मिळावे, जिल्हा परिषदेच्या महिला परिचारिकांना किमान वेतन मिळावे, बीएड कॉलेजच्या 89 कॉलेजला अनुदान मिळावे, शासकीय वस्तीगृहातील विद्यार्थ्यांचे अनुदानासाठी आंदोलन, एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय कर्मचाऱ्यांना थकीत वेतन फरकाचे मिळावे इत्यादी आंदोलनाला भेटी देऊन आंदोलन कर्त्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला , मुख्यमंत्र्यांकडे आपले विषय मांडतो असे आश्वासित केले.अशी सविस्तर माहिती विष्णू विशे संपर्कप्रमुख यांनी आमचा प्रतिनिधींना दिली आहे.

