1 min read

संत आदिशक्ती मुक्ताबाई प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या आयोजन,
ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार ह भ प डॉक्टर रवींद्र जी भोळे यांचे होणार प्रवचन

Loading

श्री संत आदिशक्ती मुक्ताबाई प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या आयोजन,
ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार ह भ प डॉक्टर रवींद्र जी भोळे यांचे होणार प्रवचन
पिंपरी चिंचवड पुणे: श्री संत आदिशक्ती मुक्ताबाई प्रतिष्ठान व लेवा युवा संघ पिंपरी चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमानाने येथे श्री संत आदिशक्ती मुक्ताबाई प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम ह्या महिन्यात दिनांक 12 तारीख शुक्रवारपासून सोहळ्याला सुरुवात होणार आहे. ह्या कार्यक्रमाची सांगता दिनांक 16 तारखेला होणार आहे. दिनांक 12 तारखेला कलश मिरवणूक, कलश पूजन, कलश स्थापना आदिशक्ती मुक्ताबाई मूर्तींची मिरवणूक ,व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 13 रोजी देवीचा अभिषेक, मूर्ती फुलांमध्ये ठेवणे तसेच महिला भजनी मंडळ, गजानन नगर दिघी येथील भजनी मंडळाचा सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम होईल. तसेच त्याच दिवशी चार वाजता सुप्रसिद्ध समाजसेवक प्रवचनकार प्रबोधनकार अपंग ह भ प डॉ.रवींद्रजी भोळे उरुळी कांचन यांचे सुश्राव्य प्रवचनाचा कार्यक्रम होईल. श्री संत आदिशक्ती मुक्ताबाई यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश ज्योत टाकणारे तसेच ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा ‘या विषयावर प्रबोधनात्मक प्रवचन होईल. दिनांक 14 रोजी देवीचा अभिषेक व मूर्ती धान्य ठेवणे समारंभ होईल. ह्याच वेळी एक लक्ष दीपक प्रज्वलनाचा कार्यक्रम होईल व महाप्रसादाचे वाटप करण्यात येईल. दिनांक 14 रोजी देवीचा अभिषेक व मूर्ती धान्य ठेवण्याचा समारंभ होईल. ह्याच वेळी सकाळी दहा वाजता ह भ प चांगुना बाई चौधरी यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याच दिवशी संध्याकाळी महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले आहे. दिनांक 15 रोजी सोमवारला पुण्य वचन मातृका पूजन व देवी स्थापना नवग्रह ईशान्य पूजन व होम हवन होईल. सायंकाळी सहा वाजता महाआरती व महाप्रसाद वाटप करण्यात येईल. तसेच संध्याकाळी सात वाजता मलकापूर येथील ह भ प रोहिणीताई धांडे यांचे कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. तसेच दिनांक 16 तारखेला मंगळवार रोजी सकाळी आठ वाजता ह भ प रोहिणीताई धांडे यांचे प्रवचनाचा कार्यक्रम होणार आहे. तसेच सकाळी महाप्रसादाचे वाटप करण्यात येईल. ह्या कार्यक्रमाला राज्यभरातून अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. ह्या मान्यवरांमध्ये प्रामुख्याने आमदार एकनाथराव खडसे माजी महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य, खासदार श्रीमती रक्षाताई खडसे रावेर, आमदार श्री महेश दादा लांडगे भोसरी, विलास शेठ लांडे पाटील माजी आमदार भोसरी, नितीन काळजे माजी महापौर पुणे, नामदेवराव ढाके सत्तारूढ पक्षनेते ,यांच्यासह अनेक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित राहतील.हा कार्यक्रम गणेश नगर भोसरी आळंदी रोड दिघी येथे संपन्न होणार आहे, असे लेवा युवा संघ पिंपरी चिंचवड व श्री संत आदिशक्ती मुक्ताई प्रतिष्ठान चे अध्यक्ष अमोल विष्णू पाटील यांनी पत्रकार द्वारे कळविले आहे. या कार्यक्रमाच्या आयोजन श्री अमोल विष्णू पाटील, सचिन पाटील, उद्धव नारखेडे, संदीप बराटे, श्रीराम पाटील, चांगो बेंडाळे, लाला पाटील, अरविंद कोलते, योगेश नारखडे, दीपक नारखेडे, सागर पाटील, पुरुषोत्तम बेंडाळे, चेतन चोपडे ह्यांनी आयोजित केले आहे. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर कीर्तनकार, प्रवचनकार, भाविक भक्त उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम गणेश नगर भोसरी आळंदी रोड दिघी पुणे येथे होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *