1 min read

११ मे – प्रशासकीय स्तरावर ” महात्मा दिन ” म्हणून साजरा करावा श्री संत सावता माळी युवक संघ, महाराष्ट्र राज्य यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.

Loading

प्रति.
मा. एकनाथ शिंदे साहेब,
मुख्यमंत्री
महाराष्ट्र राज्य.

विषय – ११ मे – प्रशासकीय स्तरावर ” महात्मा दिन ” म्हणून साजरा करावा श्री संत सावता माळी युवक संघ, महाराष्ट्र राज्य यांची मागणी.

महोदय,

शेतकऱ्यांवरील अन्यायाविरुद्ध आसुड ओढणारे जात-पात, अस्पृश्यता, स्त्री-पुरुष असमानता काढून टाकून स्त्रीशिक्षणाचा पाया रचणारे थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1848 साली पुणे येथे भिडेच्या वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली व शिक्षणाची महाद्वारे स्त्रियांकरता मुक्त केली. विधवा स्त्रियांना दुःखाच्या दरीतून वर काढण्यासाठी क्रांतीसूर्याने विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार केला व सन 1864 साली पहिला पुनर्विवाह घडवून आणला.

शेतकरी हा देशाचा खरा कणा आहे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांची पिळवणूक थांबावी म्हणून त्यांनी सरकारकडे प्रयत्न केले.

रायगडावर जाऊन सर्वप्रथम छत्रपती शिवरायांची समाधी शोधून जगातील पहिली शिवजयंती साजरी केली. शिवरायांचा आधुनिक काळातील पहिला पोवाडा लिहून शिवस्मारकाची संकल्पना त्यांनी मांडली.24 सप्टेंबर 1873 रोजी ज्योतिरावांनी भगवान बुद्धांच्या स्वातंत्र्य आणि समतेच्या मार्गाचा अवलंब करून सत्यशोधक समाजाची स्थापना करून पुरोहितांकडून होणारे अन्याय अत्याचार आणि गुलामगिरीतून शुद्रनिशुद्र समाजाला बाहेर काढून सामाजिक समता व समताप्रधान समाज निर्मिती केली.

सन 1868 – दुष्काळात राहत्या घरातील हौद अस्पृश्यांसाठी खुला केला.
सन 1880 – दारूची दुकाने सुरू करण्यास विरोध केला.
सन 1882 – विल्यम हंटर शिक्षण आयोगासमोर निवेदन दिले यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याची मागणी केली.
सन 1887 – नवीन मंगलाष्टकांची व नवीन पूजाविधीची रचना करून पुरोहिताशिवाय विवाह घडवून आणण्यास सुरुवात केली.
सन 1863 – बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली.
सन 1865 – विधवांच्या केशवपनाची विरुद्ध न्हाव्यांचा संप घडवून आणला.

आपले विचार तळागाळातल्या समाज पर्यंत पोचविण्यासाठी शेतकऱ्यांचा आसूड, ब्राह्मणांचे कसब, संसार, सार्वजनिक सत्यधर्म, गुलामगिरी, अस्पृश्यांची कैफियत, छत्रपती शिवाजी महाराज यांन वरील पवाडा इत्यादी अमोल ग्रंथनिर्मिती केली. समाजाला प्रबोधनाची व सामाजिक परिवर्तनाची वाट दाखविण्यासाठी त्यांनी लिहिलेले ग्रंथ हे मार्गदर्शक ठरले. आजही त्यांची ही ग्रंथसंपदा समाजाला दिशादर्शक व प्रेरणादायी ठरत आहे. त्या प्रमाणे त्याचे अनुलोकन करून, समस्त मानव जातीला त्यांचे आचार विचार पटऊन त्या प्रमाणे वागून, जाती भेदाचे राजकारण बाजूला ठेऊन त्यांनी संपूर्ण मानव जातीला जगण्याचा, वागण्याचा एक संदेश दिला आहे. फुलेंनी आपले आयुष्य समाजासाठी देत असतानाच *दिनांक 11 मे 1888 रोजी महाराष्ट्रातील दुसरे समाजसुधारक रावबहाद्दूर विठ्ठलराव कृष्णाजी वडेकर यांच्या हस्ते मुंबईतील कोळीवाडा येथील जनतेने लाखोंच्या उपस्तीत फुले यांना महात्मा* ही पदवी बहाल केली. त्या वेळे पासून देश त्यांना *महात्मा ज्योतिराव फुले* म्हणून ओळखू लागली आहे. सन 2016 पासून श्री संत सावता माळी युवक संघ 11 मे हा *“महात्मा दिन”* म्हणून मोठया उत्साहाने लोकाभिमुक / जनहितार्थ उपक्रम तसेच त्यांचे कार्य, त्यांचे विचार लोकां पर्यंत पोहचऊन साजरा करत आहे. मागच्या वर्षी २८ जिल्ह्यमध्ये *11 मे - महात्मा दिन* म्हणून साजरा केला, शासन दरबारी सुद्धा हा दिवस *11 मे - महात्मा दिन* म्हणून साजरा करावा ह्या साठी निवेदन देऊन आम्ही सर्व जन प्रयत्न करत आहे.

आता हा दिवस राज्य सरकारने सुद्धा प्रशासकीय स्तरावर “ महात्मा दिन ” म्हणून साजरा करण्याची मागणी श्री संत सावता माळी युवक संघ, महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष सचिन भाऊसाहेब गुलदगड या नात्याने मी राज्य सरकारकडे करत आहे.

आधुनिक विचारवंतांनी फुलेंना महाराष्ट्राचे मार्टिन लुथर म्हणून गौरविले आहे.*भारतरत्नाचे* खरे मानकरी असलेले महात्मा ज्योतिराव फुले यांना अभिवादन करून दिनांक *11 मे हा दिवस " महात्मा दिन " म्हणून साजरा करावा हि नम्र विनंती* *"सत्याचा पालन वाला हा धन्य ज्योतिबा झाला"* *"पतितांचा पालन वाला हा धन्य महात्मा झाला"*

अशा या थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांना मानाचा मुजरा…. 🙏

प्रति,
मा.देवेन्द्र फडणवीस,उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य.
मा. छगन भुजबळ,मा उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य.
मा. जिल्हाधिकारी साहेब, अहमदनगर जिल्हा. आपला विश्वासू

श्री.सचिन भाऊसाहेब गुलदगड, संस्थापक / अध्यक्ष – श्री. संत सावता माळी युवक संघ, महाराष्ट्र राज्य.
पत्ता= “सुलक्ष्मी” निवास,
सावतानगर, गुलदगड मळा,
तनपुरेवाडी रोड, राहुरी
ता. राहुरी, जि. अहमदनगर.
【 मो. न.9850869701 ]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *